BRICSचा दुसरा दिवस मोदींसाठी महत्त्वाचा; महत्त्वाच्या नेत्यांशी जागतिक मुद्द्यांवर चर्चा

BRICS Summit 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी सात देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार असून, जागतिक विकास आणि व्यापारावर चर्चा होणार आहे.

BRICS Summit 2026

BRICS Summit 2026: भारताच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेचा आज (13 सप्टेंबर) दुसरा आणि अंतिम दिवस आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे BRICS सदस्य आणि भागीदार देशांचे नेते एकत्र आले आहेत. आजच्या सत्रात जागतिक विकासासमोरील आव्हाने, व्यापार, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत विकास या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ‘ नवीन तंत्रज्ञान, सहकार्य आणि शाश्वतता: सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्य घडवणे’ हा आजच्या खुल्या सत्राचा मुख्य विषय आहे.

मोदी-जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; सात वर्षांनंतर भारत-चीन संबंधांत नवे पर्व, ‘या’ 7 मुद्द्यांवर शिक्कामोर्तब

रविवारी सकाळी 10 वाजता परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. यामध्ये नेत्यांचे संयुक्त छायाचित्र सत्र आणि त्यानंतर गट बैठक होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, वाढता व्यापार तणाव, शुल्कवाढ, भू-राजकीय संघर्ष आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  सदस्य देशांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

मोदींच्या सात द्विपक्षीय बैठका

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सात देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दक्षिण आफ्रिका, कझाकिस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, बुरुंडी, युगांडा आणि नायजेरिया या देशांच्या प्रमुखांसोबत मोदींच्या बैठका होणार आहेत. यामध्ये द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

‘नवी दिल्ली जाहीरनामा’त शुल्कवाढीला विरोध

BRICS देशांनी शनिवारी ‘नवी दिल्ली जाहीरनामा’ स्वीकारला. व्यापार, दहशतवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता, संस्थात्मक सुधारणा आणि जागतिक शांततेसह विविध मुद्द्यांवर सदस्य देशांनी समान भूमिका मांडली. वाढत्या भू-राजकीय तणावाबाबत चिंता व्यक्त करताना एकतर्फी शुल्क आणि व्यापार निर्बंधांनाही विरोध करण्यात आला.

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

BRICS देशांमधील सीमापार व्यवहार आणि गुंतवणूक अधिक सुलभ करण्यावरही भर देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेला विरोध करणाऱ्या एकतर्फी दबावात्मक उपाययोजना मागे घेण्याचे आवाहन जाहीरनाम्यात करण्यात आले आहे.

पश्चिम आशिया आणि युक्रेन युद्धावरही चर्चा

यंदाची BRICS परिषद जागतिक पातळीवरील संघर्ष आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर होत आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, युक्रेन युद्ध, अमेरिकेची शुल्कवाढ, व्यापारातील तणाव आणि वाढती भू-राजकीय अस्थिरता या मुद्द्यांवरही नेत्यांकडून चर्चा होत आहे.

“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

नवी दिल्ली जाहीरनाम्यात पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित देशांनी संयम बाळगावा आणि संवाद व राजनैतिक मार्गाने वाद सोडवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोदींच्या डिनरला केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री उपस्थित

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BRICS नेत्यांसाठी भारत मंडपम येथे विशेष मेजवानीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सहभागी देशांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.

दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद यांच्या अनुपस्थितीचीही चर्चा झाली.

मलेशियाच्या पंतप्रधानांचा किशोर कुमार अंदाज

BRICS परिषदेदरम्यान मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचा एक व्हिडिओही चर्चेत आला आहे. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये त्यांनी किशोर कुमार यांचे प्रसिद्ध ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ हे गाणे गायले. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीन देवियां’ चित्रपटातील हे गाणे आहे. अन्वर इब्राहिम यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

BRICSची पुढील दिशा काय?

BRICSमध्ये सध्या 11 सदस्य देश आहेत. भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसह इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समूहात समावेश आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारणात BRICSचे महत्त्व वाढले आहे.

मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक विकासासमोरील आव्हाने, व्यापार, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत विकास या प्रमुख मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी BRICSची पुढील दिशा ठरवण्यावर आजच्या चर्चेचा मुख्य भर असेल.

follow us