Budget 2026 : बजेट अन् लाल रंगाचं नात काय?; पेटाऱ्यातून समोर आली इंट्रेस्टिंग स्टोरी
Budget 2026 देशाचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये सादर झाला. त्यावेळी देश पूर्णपणे ब्रिटिश राजवटीखाली होता आणि प्रशासकीय नियम ब्रिटिशांचेच होते.
Budget & Red Color Combination What Is History Behind This : संपूर्ण देशाचं बजेट सादर होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचाच अवधि शिल्लक राहिला आहे. अर्थसंकल्पाबाबत आपण याआधी काही इंट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेतल्या आहेत. मात्र आज सादर होणारं बजेट नेहमी लाल रंगाच्या ब्रिफकेसमध्येच का असतं? याबद्दलची खास गोष्ट पेटाऱ्यातून समोर आली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
Stock Market On Budget Day : गेल्या 10 वर्षांत मार्केटचा ग्राफ कसा? कधी घसरला, कधी वाढला?
दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी देशभरात सर्वाधिक पाहिले जाणारे एक चित्र म्हणजे अर्थमंत्री संसदेच्या पायऱ्यांवर उभे असलेलं चित्र. या फोटोचं बारकाईनं निरीक्षण केलं तर, तुम्हाला अर्थमंत्र्यांच्या हातात एक लाल रंगाची ब्रिफकेस दिसते. आता लाल रंग आणि बजेटचा काय संबंध? ही फक्त एक परंपरा आहे की, त्यामागे शक्ती-इतिहास आणि काही विचार दडलेत?
Budget 2026 : अर्थसंकल्पापूर्वी सादर होतो ‘इकोनॉमिक सर्व्हे’; 75 वर्षांपासून सुरू आहे परंपरा…
लाल रंग अन् बजेटचं कनेक्शन
तर, बजेट आणि लाल रंग यांच्यातील संबंध कुठून सुरू झाला? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हाती लागलेल्या माहितीनुसार भारतातील अर्थसंकल्प आणि लाल रंगाचा संबंध थेट ब्रिटिश राजवटीशी जोडलेला आहे. शतकानुशतके, ब्रिटनमध्ये सरकारी, कायदेशीर आणि आर्थिक कागदपत्रे लाल कव्हरमध्ये ठेवली जात होती. यामागचं कारण म्हणजे लाल रंग हा शक्ती, अधिकार आणि गंभीर निर्णयांचे प्रतीक मानला जातो. जेव्हा ब्रिटिशांनी भारतात प्रशासकीय संरचना स्थापन केल्या तेव्हा त्यांनी अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या आर्थिक फायलींसाठी ही परंपरा स्वीकारली.
परंपरा कुठून सुरू झाली?
भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये सादर करण्यात आला. त्यावेळी देश पूर्णपणे ब्रिटिश राजवटीखाली होता आणि प्रशासकीय नियम देखील ब्रिटिशांचेच होते. तेव्हापासून लाल कव्हर किंवा लाल ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू झाली. स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा अनेक दशके चालू राहिली आणि लाल ब्रीफकेस अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य बनले.
यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार?, अर्थतज्ज्ञांमध्ये काय आहे चर्चा?
लाल रंग निवडण्यामागचं खरा अर्थ
लाल रंगाला जबाबदारी, शक्ती आणि गांभीर्याचे प्रतिक मानले जाते. त्यात अर्थसंकल्प हा एक दस्तऐवज आहे जो देशाचे उत्पन्न, खर्च, कर, योजना आणि आर्थिक दिशा ठरवतो. ज्याचा परिणाम संपूर्ण देशावर होत असतो. त्यामुळे आता लाल ब्रीफकेस ही केवळ सरकारी परंपराच नाही तर, सामान्य लोकांच्या दृष्टीने अर्थसंकल्पाचे प्रतीक देखील बनली आहे. हातात लाल फाईल घेऊन अर्थमंत्री टीव्ही स्क्रीनवर येताच लोकांना कळले की, आता अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा रंग अर्थसंकल्पाशी इतका जोडला गेला की लाल ब्रीफकेसशिवाय अर्थसंकल्पाची कल्पना करणे कठीण झाले.
शतकानुशतके चालत आलेली परंपर 2019 मध्ये खंडित झाली
ही झाली अर्थसंकल्प आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल रंगाच्या ब्रिफकेसबद्दलची माहिती मात्र, 2019 मध्ये ब्रिफकेस वापरण्याची परंपरा खंडित झाली. त्यावेळी अर्थमंत्र्यांनी ब्रिफकेसऐवजी एक साधा लाल रंगाचा फोल्डर वापरला. हा बदल वसाहतवादी परंपरांपासून दूर जाण्याचे प्रतीक होता. देश आता त्याच्या धोरणांकडे आणि चिन्हांकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहत आहे हाच संदेश भारत सरकारला या बदलातून द्यायचा होता.
