बंगाल अन् तमिळनाडूत बंपर मतदान; सत्ता बदल होणार की सत्ताधारी मारणार बाजी?
Tamil Nadu And West Bengal Election : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंपर मतदान होताना दिसत आहे. निवडणूक
Tamil Nadu And West Bengal Election : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंपर मतदान होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 पर्यंत तब्बल 89.93 मतदान झाला असून तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असणाऱ्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 82 टक्के मतदान झालं आहे. एकाच टप्प्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीत मतदारांचा हा मोठा सहभाग दिसून येत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी द्रमुक (DMK), भाजप-प्रणीत ‘एनडीए’ (NDA) आणि अभिनेता विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) या पक्षांमध्ये तिरंगी लढत होत आहे.
तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 89.93% मतदानाची नोंद झाली असून मतदान प्रक्रिया आतापर्यंत सुरु असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत आहे. राज्यातील एकूण 294 विधानसभा जागांसाठीचे मतदान दोन टप्प्यांत घेण्याचे नियोजित आहे. आजच्या पहिल्या टप्प्यात, सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सध्या 16 जिल्ह्यांमधील 152 जागांवर सुरू आहे. दरम्यान, 142 जागांचा समावेश असलेला मतदानाचा दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणीनंतर, 4 मे 2026 रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
गंगाधर सत्वधर यांना वाचक पुरस्कार जाहीर; रविवारी पुरस्कार वितरण, डॉ. दीपक पवार यांचे व्याख्यान-
कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि किती जागांवर आज मतदान होत आहे?
आज पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा उत्तर बंगालमधील 8 जिल्हे, दक्षिण बंगालमधील 3 जिल्हे आणि ‘जंगलमहाल’ क्षेत्रातील 5 जिल्ह्यांमध्ये पार पडत आहे. आजच्या मतदानानंतर ज्यामध्ये मुर्शिदाबादमधील 22 जागा, कूचबिहारमधील 9, जलपाईगुडीमधील 7, अलीपूरद्वारमधील 5, कालिम्पोंग 1, दार्जिलिंग 5, उत्तर दिनाजपूर 9, दक्षिण दिनाजपूर 6, मालदा 12, वीरभूम 11, पश्चिम बर्धमान 9, पूर्व मेदिनीपूर 16, पश्चिम मेदिनीपूर 15, झाडग्राम 4, पुरुलिया 9 आणि बांकुरा येथील 12 जागांचा समावेश आहे. उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVMs) बंद होणार आहे.