बँक, डिमॅट अन् स्टार्टअप्समध्येही महिलांचा डंका; आर्थिक घडामोडींत महिलांचा वाटा वाढला..

बँक, डिमॅट अन् स्टार्टअप्समध्येही महिलांचा डंका; आर्थिक घडामोडींत महिलांचा वाटा वाढला..

Indian Women Bank Accounts Report : भारतातील एकूण बँक खात्यांपैकी तब्बल 39.2 टक्के बँक खाते महिलांच्या नावावर आहेत. ग्रामीण भागात तर हा आकडा आणखी जास्त आहे. या भागात 42.2 टक्के महिलांच्या नावावर बँक खाते आहेत. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने रविवारी भारतात महिला आणि पुरुष 2024 : चयनित संकेत आणि तथ्य शीर्षकासह प्रकाशित रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

या रिपोर्टमध्ये लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, आर्थिक भागीदारी, निर्णय, निर्माण यांसारख्या क्षेत्रांतील आकडेवारी समाविष्ट आहे. ही आकडेवारी विविध मंत्रालये आणि सरकारी विभागांकडून गोळा करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार बँकेतील एकूण जमा रकमेत महिलांचा वाटा 39.7 टक्के इतका आहे. ग्रामीण भागात महिलांची भागीदारी सर्वात जास्त आहे.

डिमॅट खात्यांतही महिलांची वाढती भागीदारी

शेअर बाजारातही महिलांचा कल वाढू लागला आहे. यामुळे डिमॅट खात्यांत (Demat Account) मोठी वाढ झाली आहे. 31 मार्च 2021 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान डिमॅट खाते 3.326 कोटींवरुन 14.302 कोटींवर पोहोचले आहेत. म्हणजेच यामध्ये चार पटीपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. असे असले तरी पुरुष खातेदारांची संख्या अजूनही जास्त आहे. परंतु महिलांची भागीदारी सातत्याने वाढत चालली आहे. 2021 मध्ये पुरुष खात्यांची संख्या 2.659 कोटी इतकी होती. 2024 पर्यंत ही संख्या 11.531 कोटींवर पोहोचली. याच काळात महिला खात्यांची संख्या 0.667 कोटींवरून 2.771 कोटींवर पोहोचली.

Womens Day 2025 : महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या खास 6 योजना, कसा घ्याल लाभ?

उद्योगांतही अर्ध्या लोकसंख्येचा मोठा वाटा

अहवालानुसार व्यापार, विनिर्माण आणि अन्य सेवा क्षेत्रांत महिलांच्या मालकीच्या संस्था 2021 ते 2024 याकाळात वाढलेल्या दिसून येतात. उद्योगांच्या बाबतीत महिलांची संख्या सातत्याने वाढत असल्याचा हा संकेत आहे. या क्षेत्रात महिला उद्योजकांची संख्या वेगाने वाढत चालली आहे.

लिंग आधारित मतदानाचे अंतर कमी

निवडणुकीत महिलांची भागीदारी उल्लेखनीय राहिली आहे. 1952 मध्ये भारतात एकूण 17.32 कोटी मतदार होते. 2024 पर्यंत यात अतिशय मोठी वाढ होऊन हा आकडा 97.8 कोटींपर्यंत पोहोचला आहे. यावेळी महिला मतदारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे लिंग आधारित मतदानाचे अंतर कमी झाले आहे.

स्टार्टअपमध्ये महिला गुंतवणूकदार वाढले

औद्योगिक निती आणि संवर्धन विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. 2017 मध्ये 1943 स्टार्टअप मध्ये कमीत कमी एक महिला निदेशक होती. आता 2024 मध्ये ही संख्या 17 हजार 405 इतकी झाली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले संकेत मिळत आहेत. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर लिंग समानता सूचकांक सातत्याने वाढत आहे.

स्टार्टअपसाठी वरदान! मोदी सरकारच्या ‘या’ स्कीम आहेत खास, वाचा सविस्तर..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube