Mask: अलर्ट! मास्क वापरा अन्यथा; ‘या’ रुग्णसंख्येत मोठी वाढ

Mask:  अलर्ट! मास्क वापरा अन्यथा; ‘या’ रुग्णसंख्येत मोठी वाढ

Influenza Virus :  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Central Health Ministry ) मास्क वापरण्याच्या संदर्भात नवीन सूचना जारी केल्या आहेत. सध्या देशामध्ये फ्लूच्या ( Flu Patient )  रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. यावरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणीही मास्क न वापरता जाऊ नये, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

जर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरल्यास त्यांना फ्लू होऊ शकतो. याचे कारण गेल्या सहा महिन्यात फ्लूचे रुग्ण हे 200 टक्क्यांनी वाढले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मास्क काढल्यास इन्फ्लुएन्झाचा धोका संभावण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाने वर्तवली आहे. त्यामुळे सध्या ताप व खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे.

त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्यांनी मास्कचा वापर करावा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होते आहे. पण  H3N2 इन्फ्लुएन्झाच्या विषाणुमूळे मोठ्या प्रमाणावर ताप व खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य खात्याकडून मास्क वापरण्याविषयचीचा सल्ला देण्यात आला आहे.

आमदार असताना विकासासाठी काही केले नाही…रोहित पवारांचा राम शिंदेना टोला

दरम्यान कोरोनामुळे गेली जवळपास तीन वर्षे नागरिकांनी मास्क वापरले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या कमी झालेली आहे. परंतु काही प्रमाणात आजही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्याची खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना विशेष करुन गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी मास्क वापरावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य खात्याकडून करण्यात आलेले आहे. त्याचबरोबरीने आता फ्लूच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायला सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube