तब्बल 86 लाख यूजर्सने अनुभवला चांद्रयान-3 चा ऐतिहासिक क्षण; लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मारली बाजी

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 08 22T144342.648

ISRO New Record Of Chandrayaan 3 Live Streaming :  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaam 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) काल (दि. 23) आणखी एक इतिहास रचला आहे.

विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! भल्या पहाटेच चंद्रावर मारली चक्कर; पहिला फोटो आला समोर

इस्त्रोच्या चांद्रयान 3 चे लाईव्ह स्ट्रीमिंगने यूट्यूवर तब्बल 8.06 दशलक्ष लोकांनी पाहिले आहे. ही आकडेवारी एखाद्या लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान पाहण्यात आलेली यूट्यूबच्या इतिहासातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. यामुळे आतापर्यंतच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या आकडेवारीत इस्त्रोने बाजी मारत यूट्यूबवरील सर्व रोकॉर्ड मोडले आहेत. आतापर्यंत यूट्यूबवर ब्राझील वि. कोरियाच्या फुटबॉल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग एकाचवेळी 6.15 दशलक्ष लोकांनी पाहिले होते. परंतु, बुधवारी इस्त्रोने त्यांच्या अधिकृत साईटवरून चांद्रयान 3 चे लाईव्ह स्ट्रीमिंग करत ही आकडेवारी मोडीत काढली आहे.

Chandrayaan-3 ; दक्षिण ध्रुवावर लँडिंग, विक्रम आणि प्रज्ञान देणार सूर्यमालेची माहिती

YouTube वर आतापर्यंत सर्वाधिक पाहिले गेलेले लाईव्ह स्ट्रीमिंग

इस्रो चांद्रयान-3 : 86 मिलियन

ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया फुटबॉलचा सामना : 61 लाख 50 हजार

ब्राझील वि क्रोएशिया: 52 मिलियन

वास्को वि फ्लेमेन्गो : 48 मिलियन

SpaceX क्रू डेमो: 48 मिलियन

BTS मक्खन : 37. 5 मिलियन

सेब : 3.69 मिलियन

जॉनी डेप विरुद्ध एम्बर : 3.55 मिलियन

फ्लुमिनेन्स वि फ्लेमेन्गो: 3.53 मिलियन

कॅरिओका चॅम्पियन अंतिम सामना : 3.25 मिलियन

सब्सक्राइबर्सपेक्षा यूजर्स अधिक

इस्त्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅलनवर लाईव्ह स्ट्रीमिंगपूर्वी यूजर्सची संख्या 2.68 दशलक्ष म्हणजे सुमारे 26 लाख होती. जी चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर आता 35 लाखांवर पोहोचली आहे. चांद्रयान 3 च्या लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुमारे एक तास 11 मिनिटे चालले. या तासाभरात इस्त्रोच्या यूट्यूब चॅनेलचे सब्सक्रायबर्स 9 लाखांनी वाढले. याचच अर्थ इस्त्रोचे कालचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहणाऱ्या यूजर्सची संख्या सब्यक्रायबर्सच्या तीनपट अधिक होती.

Chandrayaan 3 Landing : भारताने इतिहास रचला! चांद्रयान-3 मोहिम फत्ते करणारे खरे मानकरी कोण?

इस्रोच्या यूट्यूब चॅनेलचे 2.68 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत. परंतु केवळ 9 मिनिटांत, 2.9 मिलियन यूजर्सने चांद्रयान-3 चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी भेट दिली. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या 13 व्या मिनिटांनंतर 3.3 मिलियव यूजर्स जोडले गेले. तर, 17 व्या मिनिटाला सुमारे 40 लाख लोक लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी जॉईन झाले. 31 व्या मिनिटांनंतर 5.3 मिलियन म्हणजेच 53 लाखांहून अधिक यूजर्स इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी जॉईन झाले होते. तर, 45 मिनिटांनंतर 6.6 मिलियन यूजर्स चांद्रयान 3 चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहत होते. यानंतर काही मिनिटांतच यूजर्सची संख्या 80 लाखांच्यावर पोहोचली.

Tags

follow us