तिरंगा फडकवणे गुन्हा आहे? तर देशात ऑफिशिअली इमर्जन्सी लावा म्हणत दिपकेंचा पंतप्रधानांना सवाल
CJP Abhijit Dipake asking PM Modi सीजेपीचे नेत्यांना 5 दिवसांची कोठडी दिली आहे. यावरून आक्रमक झालेल्या दिपकेंनी थेट पंतप्रधानांना सवाल केला
CJP Abhijit Dipake asking PM Modi for hoisting Tiranaga crime Then declare official emergency in country : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर अगोदर काँग्रेस आणि त्यानंतर सीजेपीचं आंदोलन सुरू होतं. मात्र त्यानंतर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर मैदान हे आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकले. त्यामुळे या ठिकाणी तिरंगा फडकावत आंदोलन करणाऱ्या सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलीसांनी 5 दिवसांची कोठडी दिली आहे. यावरून आक्रमक झालेल्या सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी थेट पंतप्रधानांना सवाल केला आहे.
नेमकं काय म्हणाले अभिजीत दिपके?
मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की जर देशात इमर्जन्सी लावायची आहे तर ऑफिशियल करा, हे अनऑफिशियल इमर्जन्सी करत आहात, जिथे जंतर-मंतरवर तिरंगा फडकवण्यासाठी परमिशन घ्यावी लागत आहे. तिरंगा फडकवणे या देशात इतका मोठा क्राईम झाला आहे की पाच दिवस कस्टडीमध्ये पाठवत आहेत. अर्बन नक्षलवाले कोण आरोप लावत आहेत? सौरव दास आशुतोष रांका यांना बेकायदेशीरपणे कस्टडीमध्ये पाठवण्यात आले आहे. मला सुरक्षेची काही गरज नाही.
‘Narnia: The Magician’s Nephew’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज
असं काही नाहीये सगळे प्रोटेस्ट हे एकाच कारणासाठी लढत आहोत, आमच्या सगळ्याचं एकच मुद्दा आहे की, ज्ञानेश कुमार याच्या विरोधात आम्ही सगळे लढत आहोत. कॉकरोच जनता पार्टी हा वेगळा इंडिपेंडेंट प्रेशर ग्रुप आहे आणि तो नेहमीच वेगळा राहील, इंडिया ब्लॉक आणि आमचं जे आंदोलन आहे ते एकाच कॉजसाठी आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिवादन यांना करायला जाणार आहोत, आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान, विचारावर चालतो, नरेंद्र मोदी यांनी कितही प्रयत्न केला संघाची आयडॉलॉजी थोपण्याचा पण हा देश कायम बाबासाहेबांच्या विचारावर चालेलं.
कॉन्स्टिट्यूशनल बॉडी जरी असली तरी सुप्रीम कोर्टाने कुठे ना कुठे निवडणूक आयोगाची मदत केली आहे, हे जे वोट डिलिशन सुरू होतं तेव्हा सुप्रीम कोर्ट काय करत होता? बंगालमध्ये व्होट डिलीट झाले तेव्हा त्यांचा काय म्हणणं होतं? सुप्रीम कोर्ट नरेंद्र मोदींना असंच म्हणेल का की या वेळेस लढू नका पुढच्या वेळेस लढा. इंडिया ब्लॉक जे काही करत आहे ते देशाची डेमोक्रसी, संविधान वाचवण्यासाठी. हरीश साळवे यांना माझी विनंती आहे की, त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांनी ते पुरावे अमित शहा यांच्याकडे द्यावे, अमित शहा यांनी पुरावे घ्यावे आणि आमच्यावर कारवाई करावी.
अनधिकृत सदनिकांच्या नोंदणीला आळा; घरखरेदीदारांच्या हितासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदे हे काय आरोप लावतात, प्रत्येक गोष्टीत पाकिस्तान अमेरिका चायना, आपल्या राज्यात दुष्काळ पडला आहे एकनाथ शिंदे यांनी त्यावर थोडा लक्ष द्यावं. आम्ही शेतकऱ्यांसोबत नक्कीच उभे राहू पण सरकारने लक्ष दिले पाहिजे, हे सरकारचं काम आहे, आपण सरकार कशाला निवडतो, सरकारला नुसता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना फक्त निवडून टाकले आहे. आम्ही जे फंडामेंटल राइट्स आहे तो राईट टू प्रोटेस्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राईट दिलेला आहे, हे जेव्हा जिवंत नव्हते लोक जेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचा राज्य होते नाहीतर हे महात्मा गांधी यांनाही म्हटलं असते.
पुणे पदवीधर निवडणूक, शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी, निवडणुकीत नवीन ट्विस्ट येणार ?
ब्रिटिशांचे बोटं चाटायची यांची सवय होती, संघाने चापलुशी केली आहे. सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेबांचा विचार होता प्रत्येक अन्याय होणाऱ्या व्यक्तीसोबत आपण उभा राहिला पाहिजे त्याच्यासोबत लढला पाहिजे हाच आमचाही विचार आहे. आमची राहुल गांधी किंवा इतरांशी कुठलेही चर्चा नाही पण जे काही आंदोलन आहे तेच आंदोलन आमचं हे समान कॉज एक आहे. कॉकरोच जनता पार्टी हा इंडिपेंडेंट प्रेशर ग्रुप आहे, ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी निगडित नाही. आम्ही त्यांच्यासोबत यावं किंवा त्यांनी आमच्या सोबत यावं असं का जावं प्रत्येक जे आपल्या देशात घडत आहे त्याबद्दल आवाज उठवणे गरजेचे आहे.
रोहित शर्माला धक्का, IPL 2027 मध्ये ‘हा’ खेळाडू होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?
जर व्होटर लिस्ट मध्ये नावच नसेल तर बॅलेट पेपर पर्यंत जाणार कसे? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की व्होटर लिस्ट मधून लोकांचा नाव काढण्यात येत आहेत. आमच्या समर्थनात जेवढे काही पक्ष आहेत ते आहेत, ज्यावेळी जंतर-मंतरला बसलो होतो तेव्हा आम्हाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी समर्थन दिला पण काही लोकांना आम आदमी पार्टीपेक्षा दुसरं काहीच दिसत नाही. माझी काही नाही, ज्यांना मला अटक करायचे त्यांनी मला अटक करावी विमानातून करायची किंवा इतर कुठून करायची तिथून करा. तो दिल्ली पोलिसांचा एडिट केलेला व्हिडिओ आहे, माझी आजी वारल्यावर मी म्हटलं होतं की मला माझ्या भावाशी किंवा कुटुंबीयांशी बोलू द्या, रात्री साडेतीन वाजता माझ्या घरच्यांना फोन लावायचा प्रेशर का टाकण्यात आलं कारण त्यांना माझ्या वर दबाव टाकायचा होता.