मोठी बातमी! विधानसभेसाठी काँग्रेसकडून 31 नावांची घोषणा, पहा संपूर्ण लिस्ट

  • Written By: Published:
मोठी बातमी! विधानसभेसाठी काँग्रेसकडून 31 नावांची घोषणा, पहा संपूर्ण लिस्ट

Congress Candidate List Haryana : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Election) काँग्रेसने (Congress) आपल्या 31 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत हुड्डा यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांना गढी सांपला-किलोईमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

तर आज काँग्रेसमध्ये सामील झालेल्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) जुलानामधून उमेदवारी देण्यात आली आहे तर आतापर्यंत बजरंग पुनिया कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप माहिती पक्षाने दिलेली नाही.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान यांना होडलमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याविरोधात काँग्रेसने लाडवामधून मेवा सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

पहिल्या यादीत काँग्रेसकडून कालकामधून प्रदीप चौधरी, नारायणगडमधून शैली चौधरी, लाडवामधून मेवा सिंग, शाहबादमधून राम करण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच बरोबर सोनीपतमधून सुरेंद्र पनवार, गोहना येथून जगबीर सिंग मलिक, बडोद्यातून इंदुराज सिंग नरवाल पक्षाने उमेदवारी दिली आहे.

तर रोहतकमधून भारतभूषण बत्रा, बहादूरगडमधून राजिंदर सिंग जून, बदलीमधून कुलदीप वत्स , झज्जरमधून गीता भुक्कल, बेरीमधून रघुवीर सिंग कादियन, महेंद्रगडमधून राव दान सिंग, रेवाडीतून चिरंजीव राव यांना उमेदवारी दिली आहे. आफताब अहमद यांना नूह मतदारसंघातून, ममन खान यांना फिरोजपूर झिरका मतदारसंघातून, उदय भान यांना होडल मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर फरिदाबाद एनआयटीमधून नीरज शर्माला काँग्रेस उमेदवारी दिली आहे.

Pankaj Deshmukh : मोठी बातमी! पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती

5 ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागांवर मतदान होणार आहे तर 8 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. भाजपने देखील हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube