लोकसभेत राडा, पेपर भिरकवल्याने आठ खासदार निलंबित, विरोधकांचा संसदेच्या आवारात निषेध
Rahul Gandhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी लोकसभेत मोठा राडा पाहायला मिळला आहे. काँग्रेसच्या आठ खासदारांना निलंबित
Rahul Gandhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी लोकसभेत मोठा राडा पाहायला मिळला आहे. काँग्रेसच्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तालिका अध्यक्षांवर कागद फेकल्याप्रकरणी काँग्रेस खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांमध्ये अमरिंदर सिंग राजा वारिंग, हिबी एडन, माणिकम टागोर बी, गुरजीत सिंग औजला, प्रशांत यादवराव पडोळे, किरण कुमार रेड्डी, एस. वेंकटेशन आणि डीन कुरियाकोसे यांचा समावेश आहे.
या खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी नियम 3742 अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर विरोधी खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केले आणि संसद आवारात निषेध केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देखील विरोधी खासदारांसोबत उपस्थित होते.
निषेधादरम्यान विरोधी खासदारांनी घोषणाबाजीही केली. लोकसभेतून आठ विरोधी खासदारांच्या निलंबनाबाबत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा म्हणाल्या, “ही एक मूर्खपणाची कृती आहे.” लोकशाहीत प्रत्येक सदस्याला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे आणि त्यांचे विचार ऐकले पाहिजेत.
#WATCH | Delhi: Congress MPs, including Lok Sabha LoP Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra and other MPs protest at Makar Dwar of the Parliament, against the suspension of 8 MPs from Lok Sabha and against the India-US trade agreement.
The suspended MPs include Hibi Eden,… pic.twitter.com/iXQx8SAP5Q
— ANI (@ANI) February 3, 2026
लोकसभेतील गोंधळाबद्दल केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, “…आज सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कोणीतरी महासचिवांच्या टेबलावर चढले आणि कागदपत्रे फाडली. ही वाईट वृत्ती आहे.
Budget session of Parliament | In connection with the uproar in Lok Sabha and the incident of papers being thrown towards the Chair, six Opposition MPs, including Hibi Eden, Amarinder Singh, Raja Warring, Manickam Tagore, Gurjeet Singh Aujla, Prashant Yadaorao Padole and Kiran… pic.twitter.com/8YFf759b6t
— ANI (@ANI) February 3, 2026
कदाचित हे लोक असा विश्वास करतात की फक्त गांधी कुटुंबातील सदस्यच राज्य करू शकतात आणि चहा विक्रेत्याचा मुलगा कधीही राज्य करू शकत नाही. जर सभागृहाचे कामकाज चालायचे असेल तर ते त्याच्या नियमांनुसार चालले पाहिजे. सभागृह अनुशासनहीनतेने चालणार नाही.”
शनिशिंगणापूर देवस्थान अॅप प्रकरणात 77 लाखांचा अपहार उघड; अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल-
