राहुल गांधींना दुसरा फटका; खासदारकी गेली आता घरही जाणार

राहुल गांधींना दुसरा फटका; खासदारकी गेली आता घरही जाणार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आता दुसरा धक्का बसला आहे. त्यांना त्यांचे राहते घर खाली करण्याच्या सुचना लोकसभा हाऊसिंग कमिटीने दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता लाोकसभा हाऊसिंग कमिटीने हा निर्णय घेतला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली आहे.

लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार राहुल यांना सभागृहातून अपात्र ठरवण्यात आले आहे. 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात गुजरात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतरअपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राहुल 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2019 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी समस्त मोदींना चोर म्हटले होते. यावरुन पुर्णेश मोदी या भाजप आमदाराने सुरत न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यामध्ये राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. यानंतर आता लोकसभा हाऊसिंग कमिटीने त्यांना त्यांचे राहते घर सोडायला लावले आहे.

पुण्यातील राठी हत्याकांडाबाबत मोठी अपडेट; आरोपीला तात्काळ सोडण्याचे SC चे आदेश

यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ पक्षाने सोशल मीडियावर ‘डरो मत’ मोहीम सुरू केली आहे. पक्षाच्या ट्विटर हँडलवरही हे पोस्ट करण्यात आले आहे. पक्षाचे कार्यकर्ते शेअर करत आहेत. याशिवाय पक्षाच्या निदर्शनांमध्ये बॅनर्स आणि पोस्टर्सवरही या घोषणेचा वापर ठळकपणे केला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube