मोठी बातमी ! सोनिया गांधींनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत

मोठी बातमी ! सोनिया गांधींनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत

Congress Session : काँग्रेसशासित राज्य छत्तीसगड येथील रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात (Congress Session) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तथा खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजकारणातू निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी भाषणात सोनिया गांधी म्हणाल्या, की मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या सक्षम नेतृत्वात 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या (Congress) विजयाचे मोठे समाधान मिळाले. पण, मला जास्त आनंद या गोष्टीचा होत आहे, की भारत जोडो यात्रेबरोबरच माझी राजकीय कारकीर्दही थांबू शकते, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

गांधी पुढे म्हणाल्या, की सध्या काँग्रेस आणि देशासमोर आव्हानात्मक काळ आहे. भाजप (BJP) आणि आरएसएसने (RSS) देशातील प्रत्येक संस्थेवर कब्जा केला आहे. आणि या  संस्था उद्धस्त केल्या आहेत. काही ठराविक व्यापाऱ्यांना सांभाळत आर्थिक नाकेबंदी केली आहे. देशातील लोक सहिष्णुता, सद्भाव आणि समानता मिळावी या बाजूचे आहेत मात्र, सध्या देशात तसे होताना दिसत नाही.

हे सुद्धा वाचा : 2024 चा Congress चा अजेंडा क्लिअर; भाजपला पाडण्यासाठी खर्गेंनी सांगितला ‘हा’ प्लॅन..

याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (malliakrajun Kharge) यांनीही भाजप सरकारवर जोरदार प्रहार केले. त्यांनी 2024 मध्ये सरकारला पाडण्यासाठी काय करायचे आहे याची माहिती दिली. तसेच ते म्हणाले, की सेवा, संघर्ष और बलिदान सबसे पहला हिंदुस्तान ही घोषणा असेल. कारण, भाजपा सत्तेच्या स्वार्थासाठी संस्थांना धक्का देत आहे. युवकांचे भविष्य अंधारात टाकत आहेत. नोटबंदी व जीएसटीमुळे (GST) छोटे उद्योग उद्धवस्त झाले आहेत. पिकाला भाव न दिल्यामुळे शेतकरी उद्धस्त केले. ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून सरकार पाडण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Congress Session : मल्लिकार्जुन खरगेंकडून मोदी टार्गेट; म्हणाले, देशात लोकशाही आणि संविधान..

बीजेपी सरकारने छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला. येथेही छापा मारला. तरीसुद्धा येथील मुख्यमंत्री व कार्यकर्त्यांनी संघर्ष करत आधिवेशन सफल केले. नोटबंदीमुळे दोन कोटी लोकांचे रोजगार गेले. चुकीच्या जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे धंदे गेले. लॉकडाऊनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले. 12 कोटी बरोजगार झाले तर 23 कोटी लोक दारिद्र्यात ढकलले गेले. तरी सत्ताधारी त्यांची पाठ थोपटत आहेत हे विशेष.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube