IPS-IAS Controversy : सनदी अधिकारी डी रुपा अन् रोहिणी सिंधुरींचा वाद उफाळला…

IPS-IAS Controversy : सनदी अधिकारी डी रुपा अन् रोहिणी सिंधुरींचा वाद उफाळला…

कर्नाटक : कर्नाटक सरकारच्या बदलीच्या आदेशानंतरही दोन्ही सनदी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद उफाळून आल्याचं समोर आलंय. आयपीएस अधिकरी डी रुपा यांनी आयएएस रोहिणी सिंधुरी यांच्याविरोधात तीन वृत्तपत्रांमधून माहिती शेअर केली आहे.

कर्नाटक सरकारने दोन्ही अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या पदावरुन बदली केली आहे. त्यानंतर आयपीएस डी उपा यांनी शेअरमध्ये डीसी म्हैसुरु रोहिणी सिंधुरी यांनी कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांचे आकडे धुडकावल्याचा आरोप केला आहे. याबाबत आयपीएस अधिकारी रुपा यांनी फेसबुकवर लिंकसह पोस्ट केले.

उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पहिला वार

तसेच पोस्टमध्ये म्हैसूर-कोडागूचे खासदार प्रताप सिम्हा यांनी जिल्हा प्रशासनावर कोविड-19 मृत्यूच्या आकडेवारीत कथित फसवणूक केल्याबद्दल केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधले आहे. यामध्ये तत्कालीन उपायुक्त सिंधुरी यांना लक्ष्य केले आहे.

दोस्तीची ताकद, जुन्या आठवणींना उजाळा देताना बापट-नांदगावकरांचे डोळे पाणावले

तर दुसर्‍या पोस्टमध्ये, आयपीएस अधिकाऱ्याने गेल्या वर्षी डिसेंबरमधील एक पोस्ट शेअर केली. ही शेअर आयएएस अधिकाऱ्याच्या ललिता महाल रोडवरील प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (एटीआय) गेस्ट हाऊसमधून गहाळ झाल्याच्या प्रकरणाशी संबंधित होती.

सोनालीची जुनी पोस्ट पिच्छा सोडेना; निखिल वागळे म्हणतात,’बामणी वृत्ती म्हणजे…’

रोहिणी सिंधुरी यांनी म्हैसूर एटीआयमधून सरकारी वस्तू घेतल्याची माहिती आहे, ते डीसीच्या घरातही नाहीत, कुठे गेले. यावर कारवाई होते का? सरकारी वस्तू 50 रुपये किंवा 50 कोटी आहेत, ते चुकीचे असल्याचं रूपा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

म्हैसूर स्थित ATI च्या संयुक्त संचालकाने ATI च्या महासंचालकांच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी म्हैसूरच्या उपायुक्तांना (DC) पत्र लिहिले होते. एटीआयचे सहसंचालक (प्रशासन) एस पुविथा यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात म्हटले की, म्हैसूरच्या पूर्वीच्या डीसी रोहिणी सिंधुरी 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2020 या कालावधीत एटीआयच्या विश्रामगृहात थांबल्या होत्या.

Iran Shocker : इराणमध्ये शेकडो मुलींना देण्यात आले विष, धक्कादायक कारण आले समोर

रूपा यांनी 19 फेब्रुवारी रोजी सिंधुरी यांना कथित भ्रष्टाचार आणि सहकाऱ्यांसोबत “आक्षेपार्ह चित्र” असे वर्णन केल्याबद्दल निशाणा साधल्यापासून दोन जण वादात सापडले आहेत. तर दुसरीकडे सिंधुरी यांनी आरोप फेटाळून लावले आणि रूपा यांनी “खोटी, वैयक्तिक बदनामी मोहीम” चालवल्याचा आरोप केला.

त्यानंतर दोघांनी या प्रकरणावर मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याशी संपर्क साधला आणि एकमेकांवर कारवाईची मागणी केली. शर्मा यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, या दोन्ही अधिकार्‍यांना मीडियावर काहीही शेअर करणे टाळण्यास सांगितले असतानाही सिंधुरी विरुद्ध रूपा यांचा वाद समोर आला. तुम्ही माध्यमांसमोर जाऊन गंभीर पेच निर्माण करून सरकारची बदनामी केली केल्याचंही आदेशात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube