Karnataka Election Results: जेडीएसला धक्का, माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींच्या मुलाचा पराभव

Karnataka Election Results:  जेडीएसला धक्का, माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींच्या मुलाचा पराभव

Karnataka Election Results: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD DeveGowda) यांचे नातू आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी (Nikhil Kumaraswamy) यांना पक्षाच्या बालेकिल्ल्यात रामनगरममध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. निखिल कुमारस्वामी यांना रामनगरम जागेवर काँग्रेसचे एचए इक्बाल हुसेन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. निखिल यांचा 10,715 मतांनी पराभव झाला.

यासह, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा सलग दुसरा पराभव आहे. विशेष म्हणजे, एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी या रामनगरमच्या विद्यामान आमदार होत्या. या निवडणुकीपूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निखिलने मंड्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु तरीही निखिलचा भाजप समर्थक अपक्ष उमेदवार सुमलता अंबरीश यांच्याकडून पराभव झाला. त्यांचा सुमलता अंबरीश यांनी 1.25 लाख मतांनी पराभव केला.

सध्याच्या विधानसभा निवडणुकीत निखिलला 76,975 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार एचए इक्बाल हुसेन यांना 87,690 मते मिळाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, भाजप उमेदवार गौतम मेरिलिंगगौडा 12,912 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. निखिल कुमारस्वामी व्यवसायाने एक अभिनेता आहे. याआधीही अर्धवेळ राजकारण केल्याचा आरोप आहे. गेल्या लोकसभेतील पराभवानंतर निखिल आपल्या व्यवसायात सक्रिय झाला होता. मात्र त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले.

Karnataka Election Results : सिद्धरामय्यांच्या जादू पुढं जेडीएसच्या उमेदवाराच डिपॉझिट जप्त

रामनगरम विधानसभा जागा एचडी कुमारस्वामी आणि त्यांच्या कुटुंबासाठी नेहमीच खास राहिली आहे. रामनगरम ही जागा 2004 पासून जेडीएसकडे आहे. मात्र आता ही जागा या कुटुंबाच्या हातातून गेली आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी येथून चार वेळा निवडणूक जिंकले आहेत. 2004, 2008, 20013, 2018 मध्ये ते या जागेवरून विजयी झाले होते. याआधी देवेगौडा यांनी 1994 मध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube