दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन कवच; 1 किलो हेरॉईनसह 60 किलो गांजा जप्त

Delhi Police

Delhi Police Campaign Against Drugs : भारत सरकारने देशभरातील तपास यंत्रणांना ड्रग्जच्या विरोधात मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र टास्क फोर्सही स्थापन केला आहे. याअंतर्गत 13 मे रोजी दिल्लीतील सर्व 15 जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन कवच नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व 15 जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या लोकांवर छापे टाकण्यात आले.

वज्रमुठीला आधीच तडे गेलेत; फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत. 128 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आणि या क्रमात 1000 हून अधिक पोलिसांचा सहभाग होता. क्राइम ब्रँचचे स्पेशल सीपी रवींद्र यादव यांनी सांगितले की, ऑपरेशन कवचचा उद्देश देशाची राजधानी ड्रग्जमुक्त करणे आहे. यासाठी गुन्हे शाखेच्या देखरेखीखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे.

विशेष सीपी रवींद्र यादव म्हणाले की, केवळ गुन्हे शाखाच नाही तर सर्व 15 जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांनाही अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा भाग बनवण्यात आले आहे. 13 मेच्या रात्री या टास्क फोर्सने सर्व जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या लोकांच्या अड्ड्यावर छापे टाकले. या छाप्यापूर्वी सर्व जिल्ह्यांच्या डीसीपींशी बोलून त्यांना छाप्याशी संबंधित माहिती गोपनीय ठेवण्यास सांगण्यात आले. सर्वांनी समन्वय साधला आणि मग छापा टाकला.

रवींद्र यादव यांनी सांगितले की, ऑपरेशन कवच अंतर्गत 100 हून अधिक छापे टाकण्यात आले. त्याअंतर्गत सुमारे 1 किलो हेरॉईन, सुमारे 60 किलो गांजा आणि अवैध दारूही जप्त करण्यात आली आहे. स्पेशल सीपी रवींद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत अमली पदार्थांच्या तस्करीमागे अफगाणिस्तानचा मोठा हात आहे. तेथून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विशेषत: हेरॉईन भारतात पुरवठा केला जातो आणि नंतर तो देशभर पाठवला जातो.

Tags

follow us