Online Betting: ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी, मोठे घबाड हाती !

  • Written By: Published:
Online Betting: ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी, मोठे घबाड हाती !

Ed Raided Online Betting: देशात ऑनलाइन बेटिंगद्वारे (Online Betting) मोठ्या प्रमाणात पैसा कमविला जात. कायद्यानुसार हे बेकायदेशीर आहे. त्यानंतर अनेक बेटिंग अॅप सर्रास सुरू आहेत. त्याविरोधात आता ईडीने (ED) कारवाई सुरू केली आहे. ईडीच्या पथकाने शुक्रवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. मध्य प्रदेशमधील इंदौर, कर्नाटकातील हुबळी, महाराष्ट्रातील मुंबई शहरात ईडीने छापे टाकले. त्यात बेकायदेशीर कागदपत्रे, उपकरणे आणि सुमारे 46 लाख रुपयांचे रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मोठी बातमी! शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस

ऑनलाइन बेटिंग अॅपप्रकरणी मध्य प्रदेशमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. धन गेम्स आणि सट्टा मटका हे अॅप मध्यप्रदेश आणि कर्नाटक व देशातील काही भागातून चालविण्यात येत होते. त्यासाठी लोकेश वर्मा नावाच्या व्यक्तीचे बोगस बँक खाते उघडण्यात आलेत. त्यामार्फत बेटिंगचा व्यवहार करण्यात येत होता. त्यासाठी बँकेच्या केवायसीचे कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आल्याचे तपासात समोर येत आहे.

गद्दारीचा शिक्का जाणार नाही, सगळ्यांना साफ करतो अन् खरी शिवसेना दाखवतो; ठाकरेंची भाजप-शिंदे गटावर टीका

त्यातून पैसांचा व्यवहार करून स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. आनलाइन बेटिंगद्वारे बेकायदेशीरपणे पैसे कमविले जात होते. त्यातून जमिन, प्लॉट, घरे खरेदी करून तो पैसे कायदेशीर केला जात असल्याचे ईडीच्या चौकशीत समोर येत आहे. परंतु या प्रकरणी कुणाला अटक करण्यात आलेले नाही. त्याबाबत अधिकृत माहितीही ईडीकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube