एल्विशला अटका करा, मनेका गांधींच्या वक्तव्यावर एल्विशची टीका; ‘लोकसभेचं तिकीट मिळतं…’

  • Written By: Last Updated:
एल्विशला अटका करा, मनेका गांधींच्या वक्तव्यावर एल्विशची टीका; ‘लोकसभेचं तिकीट मिळतं…’

Elvish Yadav on Maneka Gandhi : युट्यबर आणि Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश याद (Elvish Yadav) चांगलाच अडचणीत सापडला आहे. एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष परवल्याचा आरोप आहे. एल्विशमुळ राज्यासह देशभर वातावरण चांगलचं आहे. भाजपा खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी एल्विशच्या अटकेची मागणी केली. त्याला आता एल्विशने जोरदार प्रत्युत्तर दिलं.


Govardhan Sharma : सलग सहा वेळा आमदार झालेले गोवर्धन शर्मा यांचं निधन 

एल्विशने ट्वीट करत मनेका गांधींवर निशाणा साधला. त्यानं लिहिलं की, इस्कॉनवर आरोप करा. माझ्यावरही आरोप करा… लोकसभेच तिकीट असं मिळतं का? अशा शब्दात खोचक टीका केली. त्यानं #shameonmanekaganthi हा हॅशटॅगही वापरला आहे.

तर नंतर लगेच एल्विशने दुसरं ट्वीट करत मनेका गांधींचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये त्याने लिहिलं की, अशी लोकं महत्वाच्या पदांवर बसलेली आहे, हे पाहून आश्चर्य वाटतं. मॅडम यांनी ज्या प्रकारे आरोप केले आहेत. तशी माफीही तयार ठेवा, असं म्हणत एकप्रकारे आपण निर्दोश असल्याची कबुली दिली.

प्रकरण काय आहे?

एका एनजीओच्या स्टिंग ऑपरेशननंतर नोएडा पोलिसांनी सेक्टर 49 परिसरात छापा टाकला. या छाप्यात पाच कोब्रा आणि अन्य सापांसह एकूण नऊ साप सापडले. त्याचवेळी पोलिसांना येथे सापाचे विष आढळून आले. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून इतर काही विरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. यामध्ये यूट्यूबर एल्विश यादवचाही समावेश आहे. रेव पार्टीत विषारी सापाचं विष पुरवणं, परदेशी मुलांची सप्लाय करणं असे अनेक आरोप त्याच्यावर लावण्यात आले.

दरम्यान, या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं तो म्हणाला. अनेक गंभीर आरोपांनंतर एल्विशने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे त्याने म्हटलं. माझ्या विरोधात ज्या गोष्टी पसरवण्यात येत आङेत, त्या चुकीच्या असून माज्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. मी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्याने सांगिलं. तो म्हणाला, मला मुख्यमंत्री योगी आणि पोलिसांना सांगायचे आहे की, या प्रकरणात माझा एक टक्काही सहभाग असेल तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. मीडियाने माझे नाव खराब करू नये, असं एल्विश म्हणाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube