‘…तर मनोज जरांगेंच्या हाताने आरती करा’; एल्विश यादव प्रकरणी अंधारे संतापल्या…

‘…तर मनोज जरांगेंच्या हाताने आरती करा’; एल्विश यादव प्रकरणी अंधारे संतापल्या…

Sushma Andhare News : आरती करायचीयं तर समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) हाताने करा, असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान, वर्षा या शासकीय निवासस्थानी ‘बिग बॉस OTT 2’ चा विजेता एल्विश यादवच्या हस्ते आरती करण्यात आली होती. यादव आरती करतानाचे फोटो मोठ्या व्हायरल झाले. त्यावरुन सुषमा अंधारे चांगल्याचं संतापल्या आहेत.

जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानं अनेकांचे वाईट मनसुबे उधळले गेले; सामंतांचे विरोधकांवर टीकास्त्र

सुषमा अंधारे म्हणाल्या, अब्रु आपल्याच अंगणात पिकते अन् आपणच अबूचे ठेकेदार अशा तोऱ्यात वावरणारे सत्ताधाऱ्यांचे मंत्री आमदार दरवेळेला अशी लोकं तुमच्याच सोबत दिसतात. गर्दीत फोटो काढणं मी समजू शकते पण शासकीय बंगल्यावर आरती करायला हे लोकं येतात. आरती करायचीच असेल तर समाजासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या मनोज जरांगेंच्या हाताने करा समाजहितासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या जरांगेंना बोलवा, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला आहे.

Elvish Yadav : सर्पदंशाची नशा कशी असते?; जाणून घ्या शरीरावर काय होतो परिणाम

मी एल्विस यादवसंदर्भात पोस्ट टाकली आणि मला लोकांचे फोन आले. माझा आवाज बंद करू शकत नाहीत. सत्ताधारी मंत्री आमदार शाउटिंग ब्रिगेड हे आम्हाला थांबवू शकत नाहीत. हे लोकं अशाच लोकांना का बोलावतात, नेमकं गौडबंगाल का हे कळत नाही? असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्स रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्सशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

Abhijit Khandkekar: अभिजीत खांडकेकरने ‘या’ हिंदी वेब सीरिजमध्ये साकारली ‘पत्रकाराची भूमिका’

दरम्यान, देशासह राज्यात मोठ्या आंनंदात गणपती उत्सव साजरा करण्यात आला. या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवास्थानी राजकीय नेत्यांसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात प्रामुख्याने शहनाज गिल, रश्मी देसाई यांच्यासह बॉलिवूडमधील स्टार्सनी हजेरी लावली होती. यात ‘बिग बॉस OTT 2’ चा विजेता एल्विश यादवनेदेखील हजेरी लावत आरती करत शिंदेंच्या गणपतीचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर आज एल्वीशवर दिल्लीतील नोयडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हीच संधी साधत अंधारे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube