Govardhan Sharma : सलग सहा वेळा आमदार झालेले गोवर्धन शर्मा यांचं निधन
Govardhan Sharma : भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी कर्करोगाने त्यांचं निधन झालं आहे. आमदार गोवर्धन शर्मा अकोला मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.
माझे परममित्र आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालोय. लोकांत रमणारा खरा लोकप्रतिनिधी…नगरसेवक, आमदार, मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारा दिलखुलास निष्ठावान नेता भाजपाने गमावला आहे. pic.twitter.com/KWsJ6LQ3Hu
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) November 3, 2023
गोवर्धन मांगीलाल शर्मा हे विदर्भातील एक दिग्गज राजकारणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. शर्मा भाजपकडून अकोला पश्चिम मतदारसंघातून बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेलेले आहेत.
Noida Rave Case: ‘अल्विश यादववर कठोर कारवाई करा’, खासदार मेनका गांधीची मागणी
अकोल पश्चिम मतदारंसघातून गोवर्धन शर्मा पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. सर्वप्रथम 1995 साली भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी निवडणूकीत मोठ्या मताधिक्क्याने ते निवडून आले होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1949 साली यवतमाळमधील पुसदमध्ये झाला होता.
Abhijit Khandkekar: अभिजीत खांडकेकरने ‘या’ हिंदी वेब सीरिजमध्ये साकारली ‘पत्रकाराची भूमिका’
विधासभेवर निवडून गेल्यानंतर ते नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्षे त्यांनी कामकाज पाहिले आहे. राज्यात 2019 साली विधानसभा निवडणुकीतही ते भरघोस मतांनी निवडून आले होते. पश्चिम विदर्भातील ते मोठे नेते मानले जात होते.
Maratha Reservation : मराठा आणि कुणबी वेगवेगळे की एक? इतिहास संशोधक सावंत काय म्हणाले…
पश्चिम विदर्भामध्ये रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून गोवर्धन शर्मा यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अन्नपूर्णा माता मंदिराजवळ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
खळबळजनक! कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी : 15 लाखांसह ‘ईडी’ अधिकाऱ्याला अटक
दरम्यान, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत गोवर्धन शर्मा यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. “माझे परममित्र आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालोय. लोकांत रमणारा खरा लोकप्रतिनिधी…नगरसेवक, आमदार, मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारा दिलखुलास निष्ठावान नेता भाजपाने गमावला आहे” या शब्दांत मुनगंटीवारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय ठरलं?
गोवर्धन शर्मा यांच्या अंतिम संस्कारासाठी राज्यभरातील नेते उपस्थित राहणार असून गोवर्धन शर्मा यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.