Narendra Modi : पेपर लीक प्रकरणात ‘फास्ट-ट्रॅक’ न्यायालय स्थापन करणार; PM मोदींची मोठी घोषणा
Narendra Modi : देशात होणाऱ्या पेपर लीक प्रकरणात सुनावाई करण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन
Narendra Modi : देशात होणाऱ्या पेपर लीक प्रकरणात सुनावाई करण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरणावरुन देशातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. तर आता या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
याबाबत माहिती देताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, आपल्या तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य यापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही. पेपर लीक प्रकारांत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आम्ही ‘फास्ट-ट्रॅक’ न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व यंत्रणांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांची ही मालिका अशीच सुरू राहील. जे कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना सोडले जाणार नाही असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Nothing is more important than the welfare and future of our youth!
We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this…
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2026
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कॉक्रोज जनता पार्टीसह (CJP) हजारो विद्यार्थीं आंदोनल करत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह विरोधकांनी देखील पाठिंबा दिल्याने मोदी सरकारवर आता दबाव वाढताना दिसत आहे.
राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणात कारवाईची मागणी करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच 20 जुलै रोजी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आली आहे.