Chandrayan 3 : भारताने काल ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. काल सायंकाळी 6:04 वाजता चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, ही मोहिम फत्ते झालयानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष साजरा झाला. आता लँडर इमेजर कॅमेराने इस्रोला (ISRO) एक व्हिडिओ पाठवला आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरण्यापूर्वी काही क्षणांचा हा व्हिडिओ आहे. इस्रोने याबाबत ट्विट केले असून रोव्हरही सुरळीतपणे काम करत असल्याचे सांगितले आहे.
Here is how the Lander Imager Camera captured the moon's image just prior to touchdown. pic.twitter.com/PseUAxAB6G
— ISRO (@isro) August 24, 2023
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणे सर्वात कठीण आहे. येथे सपाट पृष्ठभाग नसल्यामुळे येथील तापमान उणे २३० अंश सेल्सिअस राहते. दक्षिण ध्रुवावर पाणी आणि प्रमुख खनिजे असल्याचा दावा केला जातो. त्यामुळेच इस्रोने आपले अंतराळ यान दक्षिण ध्रुवावर उतरवले आहे.
चांद्रयान-3 चा प्रवास हा खरंतर चांद्रयान-1 च्या यशानंतर सुरू झाला. पहिल्या चांद्रयानने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा शोध लावला होता. त्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर जाणे आवश्यक होते, त्यामुळे चांद्रयान-2 मोहीम आखण्यात आली. दुर्दैवाने, चांद्रयान-2 चंद्रावर सॉफ्ट-लँड करण्यात अयशस्वी झाले. पण यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञ खचले नाहीत. त्यांनी पुन्हा जोमाने चांद्रयान मोहिमेसाठी प्रयत्न केले आणि काल आता चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाले.
National Film Awards 2023: हा क्षण शब्दात वर्णन करू शकत नाही; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सलील कुलकर्णी भावूक
दरम्यान, लँडरने शूट केलेला पहिला व्हिडिओ इस्रोला मिळाला आहे. यासोबतच रोव्हरही चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे फिरत आहे. इथून पुढे या या मोहिमेतील निरक्षण आणि संशोधनसााठी महत्वाचा डेटा इस्त्रोला मिळणार आहे.
आतापर्यंत जगातील 12 देशांनी चंद्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सुमारे 141 मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. त्यापैकी 59 मोहिमा यशस्वी झाल्या नाहीत. पाच मोहिमांमध्ये काही प्रमाणात यश आले तर 69 मोहिमा यशस्वी मानल्या गेल्या.