जयपूर सिरीअल ब्लास्टमध्ये 17 वर्षांनी न्याय; चौघांना जन्मठेप 71 जणांचा घेतला होता बळी

जयपूर सिरीअल ब्लास्टमध्ये 17 वर्षांनी न्याय; चौघांना जन्मठेप 71 जणांचा घेतला होता बळी

Four sentenced to life imprisonment in Jaipur serial blasts : जयपूरमध्ये 2008 साली भयावह सिरीअल ब्लास्ट करण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल 71 जणांचा करूण अंत झाला होता. याप्रकरणी आता तब्बल 17 वर्षांनी अखेर न्याय मिळाला आहे. कारण या प्रकरणातील चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 4 एप्रिलला झालेल्या सुनावणीत त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली. यामध्ये शाहबाज, सरवर आजमी, मोहम्मद कैफ यांच्यासह 4 जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील 71 लोकांना अखेर न्याय मिळाला आहे.

नेमकी घटना काय ?

13 मे 2008 ला जयपूरमध्ये एक सिरिअल ब्लास्टची घटना घडली होती. त्यामुळे पिंक सिटी अशी ओळख असलेल्या शहरामध्ये आगीचं तांडवं माजलं होतं. तब्बल आठ ठिकाणी हे स्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल 71 जणांचा करूण अंत झाला होता. तर या घटनेमध्ये 180 लोक गंभीर जखमी झाले होते. यामध्ये शहरातील माणक चौक खंडा, चांदपोल गेट, बड़ी चौपड़, छोटी चौपड़, त्रिपोलिया गेट, जौहरी बाजार आणि सांगानेरी गेट या ठिकाणी हे स्फोट घडवून आणण्यात आले होते.

आरोग्य विभागाला जाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कारवाईला सुरुवात

भीषण! जयपूरमध्ये केमिकल टँकर स्फोट…

राजस्थानातील जयपूर शहरात धक्कादायक घटना घडली होती. शहरातील पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत अनेक वाहनांना आग लागली. तसेच पाच लोकांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.दोन्ही वाहने एकमेकांना धडकल्यानंतर येथील 20 वाहने आगीच्या विळख्यात सापडली. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. टँकरमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर 500 मीटर परिसरात केमिकल पसरले गेले. यामुळे आगीचा फैलाव वाढून आसपास असलेल्या वाहनांना देखील आग लागली. येथील एक कारखाना सुद्धा या आगीच्या विळख्यात सापडला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube