International Airport आणीबाणी घोषित; एअर इंडियाच्या विमानाचे थरारक इमर्जन्सी लँडिंग
तिरुवनंतपूरम : कालिकतहून दमामला (Dammam) जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान (Air India Express Flight) तांत्रिक कारणामुळे तिरुअनंतपुरमला (Thiruvananthapuram) वळवण्यात आले. या फ्लाइटमध्ये १६८ प्रवासी होते. एअरलाइनच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सध्या या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. हायड्रॉलिक बिघाड झाल्याने कालिकतहून दमामला जाणारे विमान राज्याच्या राजधानीकडे वळवण्यात आल्यावर शुक्रवारी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. वास्तविक हे विमान केरळमधील कालिकतहून सौदी अरेबियातील दम्मामला जाणार होते.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री १२. १५ वाजता विमान तिरुअनंतपुरम येथे उतरणार होते. या फ्लाइटमध्ये क्रू मेंबर्सबरोबर १८२ लोक यामध्ये होते. एअर इंडिया एक्सप्रेस IX ३८५ फ्लाइटचा मागचा भाग टेक ऑफ दरम्यान धावपट्टीवर आपलट्याचे सांगण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित लँडिंगसाठी विमान अरबी समुद्रात इंधन भरल्यानंतर विमानतळावर उतरले. विमानतळ व्यवस्थापनाने संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
Adani Share Price : अदानीसोबत आता LIC चा पैसाही बुडू लागला, वाचा किती कोटींचा फटका बसला?
विमानाने सुरक्षित लँडिंग केल्याने सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्याची माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसकडून देण्यात आली आहे. विमान कंपनी आता प्रवाशांना पर्यायी विमानाने दम्मामला पाठवण्याची व्यवस्था करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे विमान तिरुअनंतपुरम येथून आज दुपारी ३.३० वाजता उड्डाण करणार आहे.