सोनम वांगचुक यांची नजरकैदेतून सुटका, NSA चा खटलाही रद्द; लडाख हिंसाचारावर केंद्राचा मोठा निर्णय
Sonam Wangchuk काही महिन्यांपूर्वी लडाखमध्ये हिंसाचाराच्या आरोपांनंतर सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले होते.
Government revokes Sonam Wangchuk’s detention after almost six months : लडाखमधील हिंसाचारानंतर ताब्यात घेतलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अभियंता सोनम वांगचुक यांची तुरूंगातून सुटका करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) त्यांची नजरकैद तात्काळ रद्द केली आहे.
स्थिरतेचे वातावरण मजबूत करण्यासाठी निर्णय
काही महिन्यांपूर्वी लडाखमध्ये हिंसाचाराच्या आरोपांनंतर सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. लडाखमध्ये शांतता आणि स्थिरतेचे वातावरण मजबूत करण्यासाठी आणि सर्व पक्षांशी संवादाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
STORY | Government revokes Sonam Wangchuk's detention after almost six months
The Centre has decided to revoke the detention of climate activist Sonam Wangchuk with immediate effect by exercising the powers available under the National Security Act, an official statement said on… pic.twitter.com/4Ckks0ETnS
— Press Trust of India (@PTI_News) March 14, 2026
सरकारी निवेदनात म्हटले आहे की, लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून, सर्व भागधारकांशी अर्थपूर्ण संवाद साधता येईल. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन आणि सर्व पैलूंचा विचार केल्यानंतर, गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांची नजरकैद संपवण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखची सुरक्षा आणि प्रदेशाची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहील, असा पुनरुच्चार सरकारने केला आहे.
सोनम वांगचुक यांना अटक का करण्यात आली होती?
लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनामुळे लडाखमधील (Ladakh) तरुण रस्त्यावर आले होते. ते तरुण हिंसक झाले होते. त्यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वाद होऊन हिंसा उसळली. त्यात चार तरुणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने (Central GOV) या हिंसेप्रकरणी वांगचुक यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई सुरू केली होती. निषेध वाढल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) कारवाई केली होती.
