मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांना झटका.. 6 नगरसेवकांनी घेतला भाजपचा झेंडा

मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांना झटका.. 6 नगरसेवकांनी घेतला भाजपचा झेंडा

AAP : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात चौकशीसाठी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सीबीआयची नोटीस मिळाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज केजरीवाल यांना दुसरा झटका बसला आहे. गुजरातमधील सूरत महापालिकेतील (SMC) आणखी 6 नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

सूरतमध्ये पक्षाच्या सहा नगरसेवकांनी राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत 27 पैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी चार नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाले होते.

Arvind Kejariwal: केंद्र सरकाकडून केजरीवालांच्या अटकेचा कट, आपचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार आणखी सहा नगरसेवकांनी आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी दिली आहे. म्हणजे आतापर्यंत एकूण 10 नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे. चार नगरसेवक आधीच भाजपात गेले होते. त्यानंतर आणखी सहा जणांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, सूरत पालिकेतील विरोधी पक्षनेत्याचाही सहभाग आहे.

सन 2021 मध्ये सूरत महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत आपने जबरदस्त कामगिरी करत 27 जागा जिंकल्या होत्या. या महापालिकेत एकूण 120 जागा आहेत. भाजपला 93 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला मात्र भोपळाही फोडता आला नव्हता. आता आम आदमीच्या 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर भाजप नगरसेवकांची संख्या वाढून 103 झाली आहे.

मोठी बातमी ! दिल्लीतील दारू घोटाळ्यात CBI ची केजरीवालांना नोटीस; रविवारी मोठ्या घडामोडी

दरम्यान, सूरत पालिकेत आम आदमी पार्टीला चांगले यश मिळाले होते. या निवडणुकीतील विजयाच्या निमित्ताने मोदी आणि शहांच्या गुजरात राज्यात आम आदमी पार्टीचा दमदार प्रवेश झाल्याचे मानले जात होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. भारतीय जनता पार्टीच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा आम आदमी पक्षही बळी ठरला आहे. दोन वर्षांच्या काळातच भाजपने पक्षाचे 10 नगरसेवक फोडले आहेत. आता महापालिकेत फक्त 17 नगरसेवक शिल्लक राहिले आहेत.

या राजकारणाचे परिणाम आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत नक्कीच दिसणार आहेत. आम आदमी पक्षाला गुजरातमधील वाटचाल अधिक कठीण  होणार आहे. भाजपच्या या राजकारणाचा विचार करून  पुढील काळात पक्षाच्या नेत्यांना रणनिती ठरवावी लागणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube