ही मानवनिर्मित आपत्ती! गेम झोनमधील आग प्रकरणाची गुजरात उच्च न्यायालयाकडून दखल; दोघांना अटक

ही मानवनिर्मित आपत्ती! गेम झोनमधील आग प्रकरणाची गुजरात उच्च न्यायालयाकडून दखल; दोघांना अटक

Gujarat High Court Comment on Fire Rajkot Game Zone :  राजकोटच्या गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची स्वत:हून दखल घेत गुजरात उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने याबात टिप्पणी केली आहे. ही प्रथमदर्शनी ‘मानवनिर्मित आपत्ती’ असल्याचं म्हटलं आहे. शहरातील असे गेमिंग झोन आणि करमणूक सुविधा सक्षम अधिकाऱ्यांच्या आवश्यक मंजुरीविना निर्माण झाल्या आहेत, असं निरीक्षणही न्यायमूर्ती बीरेन वैष्णव आणि देवन देसाई यांच्या खंडपीठाने नोंदवलं. खंडपीठाने अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि राजकोट महापालिकांच्या वकिलांना कायद्याच्या कोणत्या तरतुदींनुसार या गेम झोनची स्थापना केली यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

 

राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 12 मुलं
दोघांना अटक

या भीषण आगीत एक नाही दोन नाही तर तब्बल २७ लोकांचा मृत्यू झाला. तसंच, अनेकजण यामध्ये जखमी झाले. दरम्यान या आग घटनेप्रकरणी रविवारी पहाटे राजकोट तालुका पोलिसांनी धवल कॉर्पोरेशनचे मालक धवल ठक्कर, रेसवे एंटरप्राइझचे भागीदार अशोकसिंह जडेजा, किरीटसिंह जडेजा, प्रकाशचंद हिरण, युवराजसिंह सोलंकी, नितीन जैन आणि राहुल राठोड आदींविरोधात गुन्हा दाखल केला.

ना हरकत प्रमाणपत्र

या प्रकरणात पोलिसांकडून तपास केल्यानंतर युवराजसिंह सोलंकी आणि नितीन जैन यांना अटक करण्यात आल्याची माहिती राजकोटचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) पार्थराजसिंह गोहिल यांनी दिली. या गेम झोनमध्ये योग्य अग्निशमन उपकरणं नव्हती. तसंच, स्थानिक अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) घेतलेली नव्हती. त्यामुळे इमारतीत आगीमुळे भीषण घटना घडू शकते हे माहीत असूनही नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

डीएनए चाचणी

घटनेची चौकशी करून 72 तासांत अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय ‘एसआयटी’ने शनिवारी रात्री उशिरा राजकोट गाठून स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली. घटनेतील मृतदेहांची ओळख पटवणं आव्हानात्मक होतं. ओळखीसाठी मृतदेह आणि पीडितांच्या नातेवाईकांचे ‘डीएनए’ नमुने गोळा करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Gujarat Bridge Collapse : मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; 2 जण ठार

मदतीची घोषणा

या आगीत मृत पावलेल्यांचे नातेवाईक आणि जखमींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’तून आर्थिक मदतीची घोषणा केली. त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये दिले जातील. गुजरात सरकारनेही मृतांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या घटनेच्या सर्व बाजूंचा तपास करत आहोत. घटनेला जबाबदार असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया एसआयटी प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सुभाष त्रिवेदी यांनी दिली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या