Gujarat Riots : सुप्रीम कोर्टाचाही तीस्ता सेटलवाड यांना दणका; प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे

Gujarat Riots : सुप्रीम कोर्टाचाही तीस्ता सेटलवाड यांना दणका; प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे

Teesta Setalwad : गुजरात उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. तिस्ताला सेटलवाड यांना दिलासा द्यायचा की नाही यावर या खटल्याची सुनावणी करणाऱ्या दोन्ही न्यायाधीशांमध्ये एकमत होऊ शकले नाही. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे. खंडपीठाच्या स्थापनेसाठी हे प्रकरण सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे.

तीस्ता सेटलवाड यांच्यावर 2022 च्या गोध्रा दंगल प्रकरणात तत्कालीन गुजरात सरकारच्या उच्च अधिकार्‍यांना गोवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. गुजरात हायकोर्टाने त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Rahul Kanal : दिशा सॅलियन प्रकरणाची फाईल पुन्हा… पक्षप्रवेश करताच राहुल कनालांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात तीस्ता सेटलवाड सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने 6.30 वाजता सुनावणीची वेळ दिली. न्यायमूर्ती एएस ओक आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

Samruddhi Accident : मृतांची ओळख पटवण्यात अडचणी, सामूहिक अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय

सुनावणीदरम्यान अधिवक्ता सीयू सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जुने निर्णय आणि आदेशांचा हवाला देत दिलासा देण्याची विनंती केली. यावेळी गुजरात सरकारच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने सांगितले की, आम्हाला आदेश पाहावा लागेल. सोमवारी सुनावणी झाली तर? असे झाल्यास आमच्या अशिलाला आत्मसमर्पण करावे लागेल आणि त्याला अटक केली जाईल, असे तीस्ता सेटलवाडच्या वकिलाने सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube