मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देणार? सर्वोच्च न्यायालयात ‘त्या’ प्रकरणात आज सुनावणी

CEC Gyanesh Kumar :  देशातील राजकारणात सध्या चर्चेत असणारे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरु असणाऱ्या

CEC Gyanesh Kumar

CEC Gyanesh Kumar :  देशातील राजकारणात सध्या चर्चेत असणारे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरु असणाऱ्या वादात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल असणाऱ्या दोन रिट याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. एका तपासानंतर दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगातील निर्णय प्रस्थापित नियमांकडे दुर्लक्ष करून घेतले जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. माहितीनुसार, हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेशी संबंधित आहे.

14  निर्णय रद्द करण्याची मागणी

योग्य प्रक्रियेचे पालन न करता अंमलात आणलेले एसआयआर (SIR) प्रक्रियेशी संबंधित 14 महत्त्वाचे निर्णय त्वरित रद्द करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे (CJI Surya Kant) केली आहे. हे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना इतर दोन निवडणूक आयुक्तांची कायदेशीर संमती किंवा मान्यता घेतली गेली नव्हती, असा दावा याचिकांमध्ये करण्यात आला आहे. निवडणूक आयोग ही अनेक सदस्यांची घटनात्मक संस्था आहे, असे याचिकांमध्ये नमूद केले आहे.

कायदा आणि संविधानानुसार, आयोगाचा कोणताही धोरणात्मक निर्णय हा एकमताने किंवा बहुमताने घेतला जाणे आवश्यक आहे. त्यामुळे, सर्व सदस्यांच्या संमतीशिवाय घेतलेल्या निर्णयांच्या कायदेशीर वैधतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.

अभिजीत दीपकेसह आम्हाला अटक करणार अन्…, CJP नेत्यांचा सरकारवर गंभीर आरोप

 सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

आजच्या सुनावणीतून या 14 वादग्रस्त निर्णयांबाबत आणि एकूणच प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) भूमिका स्पष्ट होईल. हे प्रकरण आता सरन्यायाधीश यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर असल्याने, या याचिकांबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देते, हे कामकाज पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

तर दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. सीजेपीकडून देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात सध्या केंद्र सरकारवर दबाव वाढताना दिसत असल्याने ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us