‘अगर उन्हें कुछ हुआ तो…’; लालूप्रसाद यादवांच्या मुलीचा सीबीआयला इशारा

‘अगर उन्हें कुछ हुआ तो…’; लालूप्रसाद यादवांच्या मुलीचा सीबीआयला इशारा

पटना : दोन दिवसांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ईडी, सीबीआय यासारख्या सरकारी संस्थांचा चुकीचा वापर होत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळं देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालला असल्याची खंत विरोधकांनी व्यक्त केली होती. मात्र विरोधी नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतरही केंद्रीय तपास यंत्रणांकडून (Central investigative agencies) विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाया सुरूच आहेत. आता बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Former Chief Minister of Bihar Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांची सीबीआयकडून (CBI) चौकशी करण्यात आली येत आहे. त्यानंतर आता लालूप्रसाद यांची मुलगी रोहिनी आचार्य यांनी या चौकशी प्रकरणी संताप व्यक्त करत सरकारला इशारा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, CBI ची टीम आज लालूप्रसाद यादव यांच्या घरी दाखल झाली. लालूप्रसाद हे मिसा भारती यांच्या दिल्लीमधील घरी वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी सीबीआयचे पथक दाखल झाले असून सीबीआयने त्यांची तब्बल अडीच तास चौकशी केली. 2004 ते 2009 या कालावधीत लालूप्रसाद यादव हे केंद्रीय रेल्वे मंत्री होते. ही कारवाई लालूप्रसाद यांना भेट म्हणून मिळालेल्या जमिनीशी संबंधित आहे, असं सांगितल्या जातं आहे. लालूप्रसाद यांना भेट म्हणून जमीन द्यायची आणि त्या मोबदल्यात रेल्वेत नोकरी मिळवायची, असं हे प्रकरण होतं. याच प्रकरणाच्या संदर्भात ही चौकशी सुरू आहे.

दरम्यान, सीबीआयकडून सुरू असलेल्या लालूप्रसाद यांच्या या चौकशीसंदर्भात त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्विट करत सीबीआयला आणि केंद्र सरकारला दम दिला आहे. पापा को लगातार परेशान किया जा रहा है, अगर उन्हे कुछ हुआ तो मैं किसी को नहीं छोडूंगी, पापा को तंग कर रहै हैं, यह ठीक बात नहीं है, यह सब याद रखा जाएगा.. समय बलवान होता है, उसमें बडी ताकत होती है, यह याद रखना होगा, असा इशारा त्यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.

शरद यादव यांच्या मुलीने दिला रोहिणी यांना धीर
शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनीही रोहिणी आचार्य यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी यांच्या या ट्विटवर कमेंट करताना सुभाषिनी यादव यांनी लिहिले की, वेळ कठीण आहे, पण धैर्य बाळगा, घाबरू नका. हे लोक तुम्हाला मजबूत बनवत आहेत. माझे वडील नेहमी म्हणायचे की, निर्भयता आणि धैर्यापुढे प्रत्येकजण कमकुवत आहे. या क्षणी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं ट्विट त्यांनी केलं.

नगरच्या खराब रस्त्यांचा अजितदादांच्या ताफ्याला फटका; खड्डे चुकवत गाठली पाथर्डी 

रोहिणी आचार्य यांनी लालू यादव यांना किडनी दिली आहे. लालू नुकतेच सिंगापूरहून परतले आहेत. रोहिणी आचार्य या ट्विटरवर खूप सक्रिय असतात. त्यांनी अनेकदा ट्विट करून विरोधकांवर निशाणा साधला आहे. वडील लालू यादव यांना काही झाले तर दिल्लीची खुर्ची हलवून सोडू, असा थेट इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube