भाजपने ‘EVM’मध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम; इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाणार
INDIA Alliance will go to SC Against EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम मशिनवर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केली जात आहे. सध्या महाराष्ट्रात मारकडवाडी येथे या गोष्टीचा मोठा उद्रेक झाला. (INDIA) त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेणार होते. मात्र, ते प्रशासनाकडून अडवणूक झाल्याने घेता आले नाही. (EVM) तेथे शरद पवार, नाना पटोले जाऊ आले. दरम्यान, आता इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएम मशिन विरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.
शरद पवारांसमोरच महिलांचा एल्गार; म्हणाल्या, मारकडवाडीतल्या ठिणगीचा वणवा देशात पेटणार
देशातील इंडिया आघाडीने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आता महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांच्या दरम्यान ईव्हीएमचा घोटाळा झाला आहे असा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्यात एक बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया आघाडीने हा आरोप केला आहे की, भाजपा नेतृत्वातील महायुतीने ईव्हीएममध्ये घोटाळा करुन इतका प्रचंड विजय मिळवला आहे.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ ला पार पडली. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२४ ला निकाल लागला. ज्यामध्ये महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, या जागा ईव्हीएमचा फेरफार करुन मिळवण्यात आल्या आहेत असा आरोप इंडिया आघाडीने देशात महाविकास आघाडीने राज्यात केला आहे. त्यामुळे आता सुप्रिम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.