Direct Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात केंद्राची मोठी उडी; जमा केले 13.73 लाख कोटी

Direct Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात केंद्राची मोठी उडी; जमा केले 13.73 लाख कोटी

Direct Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात केंद्र सरकारने मोठी उडी घेतल्याचे चित्र पाहण्यात आले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील 10 मार्चपर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडे वित्त मंत्रालयाने जाहीर केले आहेत. या आकडेवारीत वाढ होताना दिसत असून, जाहीर आकडेवारीनुसार सरकराने 10 मार्चपर्यंत प्रत्यक्ष कर संकलाद्वारे 13.73 लाख कोटी जमा केले आहेत, अशी माहिती CBDT ने जारी केली आहे.

सीबीडीटीतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात 10 मार्चपर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन 13.73  लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. गेल्या वर्षीपर्यंत याच कालावधीत करण्यात आलेले कलेक्शन हे एकूण संकलनापेक्षा 22.58 टक्के अधिक असल्याचे CBDT ने नमुद केले आहे.

Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…

हे संकलन एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 96.67 टक्के आणि 2022-23 या आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष करांच्या एकूण सुधारित अंदाजाच्या 83.19 टक्के आहे. त्याचवेळी दुसरीकडे करदात्यांना परतावा जारी केल्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 13.73 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 16.78 टक्के अधिक आहे.

गेल्या वर्षी ते 12.98 लाख कोटी रुपये होते. कॉर्पोरेट आयकरामध्ये 13.62 टक्के आणि वैयक्तिक आयकरात 20.73 टक्के वाढ दिसून आली आहे. वैयक्तिक आयकरामध्ये सुरक्षा व्यवहार कराचा समावेश केल्यास, संकलन 20.06 टक्क्यांनी वाढले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube