Delhi Ordinance : भाजपला मिळणार कडवं आव्हान! विरोधकांनी केली अ‍ॅम्बुलन्स अन् व्हिलचेअरची तयारी

Delhi Ordinance : भाजपला मिळणार कडवं आव्हान! विरोधकांनी केली अ‍ॅम्बुलन्स अन् व्हिलचेअरची तयारी

Opposition Unity :  विरोधी पक्षांच्या ‘I.N.D.I.A.’ आघाडीतील सर्व घटकपक्ष दिल्ली विधेयकावरुन मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. याच कारणामुळे सर्व विरोधी पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. याशिवाय आपले सर्व खासदार विधेयकावर चर्चा करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी 100 टक्के संख्येने संसदेमध्ये उपस्थित राहतील, यासाठी काँग्रेस पक्षासह इतर सर्व पक्ष प्रयत्नशील आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभेमध्ये संसदेमध्ये पुढील आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्ली क्षेत्र (संशोधन) विधेयक, 2023 वर मतदान होऊ शकते. ज्या वेळेला हे विधेयक राज्यसभेमध्ये आणण्यात येईल तेव्हा 90 वर्ष वय असलेले भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे व्हीलचेयरवर सभागृहामध्ये येऊ शकतात. तसेच झारखंडचे पूर्व मुख्यमंत्री शिबू सोरेनदेखील संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. मनमोहन सिंह व सोरेन यांची प्रकृती मागील काही काळापासून अस्वस्थ आहे.

Rajasthan Election : राजस्थानात कुणाला धक्का? सर्व्हेतून मिळालं काँग्रेसला धडकी भरवणारं उत्तर

एवढेच नाही तर जेडीयूचे 75 वर्षीय खासदार बशिष्ठ नारायण सिंहदेखील रुग्णवाहिकेतून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार व सभागृहातील पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन व काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सभागृहाचे नेते पीयुष गोयल यांच्याशी चर्चा केली व विधेयक आणण्याचा अगोदर आम्हाला त्याची पूर्वकल्पना द्यावी, अशी विनंती केली.

Akelli Teaser : नुसरत भरूचाच्या ‘अकेली’ चा अंगावर काट आणणाऱ्या टीझर रीलीज

डेरेक ओब्रायन व जयराम रमेश यांचे म्हणणे होते की, जम्मू-कश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 साली विरोधकांना कोणतीही अगोदर माहिती न देता आणले होते. त्यामुळे काँग्रेस व जेडीयूने अगोदरच आपल्या सर्व खासदारांना सदनामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. डेरेक ओब्रायन व इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहीत विधेयक हा एक गंभीर मुद्द असून याबाबत आम्हाला अगोदर माहिती द्यावी, असे म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube