विरोधकांच्या आघाडीचं INDIA नाव कसं ठरलं? डेमोक्रॅटिक की डेव्हलपमेंटवरुन खल

विरोधकांच्या आघाडीचं INDIA नाव कसं ठरलं? डेमोक्रॅटिक की डेव्हलपमेंटवरुन खल

New Delhi : बंगळुरुमध्ये पार पडलेल्या देशातील 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला एक नवीन नाव देण्यात आले आहे. त्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. जवळजवळ चार तास चाललेल्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नावाची घोषणा केली. हे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया हे नाव सुचवले आणि राहुल गांधी यांनी याला सहमती दर्शवली आहे. या नावावरुन आता भाजपकडून जोरदार खिल्ली उडवली जात आहे. त्यावरुन आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.(INDIA vs NDA rahul gandhi mamata banerjee confusion opposition meeting alliance amit malviya target congress)

Asia Cup 2023: ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, आशिया कपचे वेळापत्रक जाहीर?

सुरुवातीला 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेसाठी सोनिया गांधी यांनी संयक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) नावाखाली विविध राजकीय पक्षांची मोट बांधली होती. या आघाडीचे नेतृत्व स्वतः सोनिया गांधी यांनी केले. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील 26 विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येऊन एक नवीन आघाडी स्थापन केली आहे. त्या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) असं नाव देण्यात आलं आहे.

हे नाव ठरत असताना सुरुवातीला या आघाडीचे नाव इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स असे सुचवण्यात आले होते मात्र डेमोक्रॅटिक हा शब्द राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) नावामध्येही आहे. त्यामुळे दोन्ही नावे समान वाटण्याची शक्यता लक्षात आणून दिली. त्यानंतर डेमोक्रॅटिक हा शब्द बदलून डेव्हलपमेंट हा शब्द वापरण्यात आला. त्यातच काही नेत्यांकडून नॅशनल या शब्द वगळण्याचीही सूचना करण्यात आली होती, मात्र शेवटी तो नावामध्ये ठेवण्यात आला आहे.

Video: ‘वंदे मातरम् म्हणू शकत नाही कारण…’; अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य

इंडियामधील ‘डी’चा अर्थ काय घ्यायचा डेमोक्रॅटिक की डेव्हलपमेंट यात संभ्रम झाल्यानंतर भाजप नेते अमित मालविय यांनी विरोधकांच्या एकजुटीवर टीका केली. ते म्हणाले की, ज्यांचं एका नावावर एकमत होऊ शकत नाही ते देश काय चालवणार? त्याचबरोबर विरोधकांच्या आघाडीच्या इंडिया मधील ‘डी’चा अर्थ डेव्हलपमेंट असा घेण्यात आला असला तरी काही विरोधी नेत्यांनी मात्र ते डेमॉक्रॅटिक असल्याचे ट्वीट केले. यूपीएचे नाव इंडिया होताच विरोधी पक्षाचे नेते नव्या नावाचे श्रेय घेण्यासाठी कसे सरसावले याची भाजपने खिल्ली उडवली आहे.

सत्ताधारी-विरोधकांच्या कुस्तीपासून 8 पक्ष लांब! ‘एकला चलो रे’ भूमिका कोणाला ठरणार डोकेदुखी?

विरोधकांच्या दोन दिवसीय बैठकीमध्ये इंडियामधील ‘डी’चा अर्थ नेमका डेमोक्रेटिक की डेव्हलपमेंट यावर सविस्तर तासभर चर्चा झाली. त्यामुळे नावापासूनच विरोधकांमध्ये गोंधळ उडाल्यावरुन भाजपने निशाणा साधला. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी इंडिया हे नाव पुढे केले. पण त्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडियामधील ‘डी’च्या अर्थावर आक्षेप घेतला कारण एनडीएमध्येही ‘डी’चा अर्थ डेमोक्रॅटिक असा आहे.

विरोधकांच्या आघाडीचं ‘इंडिया’ हे नाव ठरत असताना त्या नावाव्यतिरिक्त सूचनांमध्ये सेव्ह इंडिया अलायन्स, सेक्युलर इंडिया अलायन्स, इंडियन पीपल्स फ्रंट आदी नावांचा समावेश होता. मात्र त्यातून इंडिया – इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. यूपीएचे नाव बदलून इंडिया असे केल्यामुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही त्यावर टीका केली आहे.

भाजप नेते अमित मालवीय यांनी यूपीएची तुलना कट्टरपंथीय संघटना सिमी हिच्याशी केली आहे. सीमी ही एक कट्टरपंथी संघटना होती. तिच्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर त्या संघटनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या बॅनरखाली पुन्हा एकत्र आले. मात्र ते वेगवेगळ्या बॅनरखाली पुन्हा एकत्र आल्यामुळे त्या सदस्यांच्या स्वभावात मात्र काही बदल झाला नाही आणि त्यानंतर त्या नवीन संघटनेवरही अखेर बंदी घालण्यात आली, असे म्हणत त्यांनी इंडियाला एकप्रकारे मालवीय यांनी इशारा दिला आहे.

भाजप नेते मालवीय यांनी विरोधकांच्या आघाडीला सर्कस असल्याचे म्हटले आहे. विरोधकांसाठी देश चालवणे म्हणजे पोरखेळ समजत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला विरोधकांच्या आघाडीबद्दल म्हणाले की, गाढवाचं नाव घोडा असे ठेवल्यानं तो घोडा होत नाही. विरोधकांच्या इंडियाची पुढील बैठक ही मुंबईमध्ये होईल असं बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र त्या बैठकीची तारीख मात्र अद्याप काही ठरलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube