Video: ‘वंदे मातरम् म्हणू शकत नाही कारण…’; अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 19T162614.473

MLA Abu Aazmi On Vande Mataram :  समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज विधानभवन परिसरामध्ये वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. मी वंदे मातरम् गीताचा आदर करतो पण मी ते म्हणू शकत नाही. माझा धर्म त्याला परवानगी देत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अबू आझमी म्हणाले की, “सभागृहामध्ये ज्यावेळी वंदे मातरम् होते तेव्हा मी उभा राहून त्याविषयी आदर व्यक्त करतो. पण मी ते म्हणू शकत नाही. याचे कारण माझा धर्म सांगतो की, अल्लाह ज्याने आकाश तयार बनवलं, ज्याने सूर्य, चंद्र, माणसं तयार केली. आम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाच्याही समोर डोक टेकवू शकत नाही. हे माझ्या धर्मात सांगितेल आहे. मी काही कुणाचा अपमान करत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार दिला आहे.”

CM शिंदे साईड लाईन! भाजप-राष्ट्रवादीची रणनीती; PM मोदींची अजितदादा, पटेलांशी बंद दाराआड चर्चा

अबू आझमी यांनी आज सभागृहामध्येदेखील या विषयावर भाष्य केले होते. अबू आझमी यांनी आज सभागृहामध्ये देखील वंदे मातरम् विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सभागृहात एकच हंगामा झाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनीटांसाठी तहकूब केले होते.

CM शिंदे साईड लाईन! भाजप-राष्ट्रवादीची रणनीती; PM मोदींची अजितदादा, पटेलांशी बंद दाराआड चर्चा

दरम्यान, अबू आझमी यांनी याआधी देखील वंदे मातरम् विषयी असे वक्तव्य केले होते. तेव्हा देखील सभागृहात असाच गोंधळ झाला होता. यावरुन आता पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी अबू आझमी व भाजप आमदार नितेश राणे हे दोन्ही नेते लव्हजिहाद व धर्मांतर या विषयावरुन आमने-सामने आले होते.

Tags

follow us