ब्रेकिंग! अश्लील कंटेंटवर केंद्र सरकारचा चाबूक, ‘या’ मोबाइल ॲप्सवर घातली बंदी

Indian Government Big Decision : भारत सरकारने मोठा निर्णय घेत ALTT, देसीफ्लिक्स, बिग शॉट्स आणि अन्य स्ट्रीमिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारने हा निर्णय अश्लील कंटेंटच्या विरोधातील धोरणांना योग्य ठरवत घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाला मिळालेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेण्याआधी तापसणी करण्यात आली होती. कामुक वेब सिरीजच्या नावाखाली अश्लील कंटेंट अगदी सर्रासपणे स्ट्रिमींग केला जात होता. 18 प्लस असणारे ओटीटी चॅनल कंटेंट आयटी नियम 2021 आणि भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 292/293 चे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले.
भारतातील कायदा काय सांगतो
भारतीय कायद्यांनुसार सार्वजनिक नितीमत्ता दुखावली जाईल अशा कंटेंटला अश्लीलतेच्या व्याख्येत ठेवण्यात आले आहे. आयटी अधिनियम कलम 67 आणि 67A नुसार इलेक्ट्रॉनिक रुपात अश्लील कंटेंट प्रसिद्धी आणि ट्रान्समिशनवर प्रतिबंध घातले जातात. या व्यतिरिक्त IPC कलम 292 आणि 293 अंतर्गत अश्लील वस्तू आणि कंटेंटचे वितरण आणि प्रदर्शनावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. लहान मुलांच्या शोषणाशी संबंधित सर्व डिजिटल आणि फिजिकल कंटेंटवर POCSO Act अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे.
अबब! फक्त पाच वर्षांत 10 लाख भारतीय झाले विदेशी; नागरिकत्व सोडण्याची कारणेही धक्कादायक
स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म्सवर रेग्यूलेशनचा अभाव
ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सेल्फ रेग्युलेशनचा अधिकार दिला होता. मात्र अनेक प्लॅटफॉर्म्सने या सुविधेचा चुकीचा वापर केला आणि रेग्युलेशनची मर्यादाही तोडली. परिणामी सरकारलाच या हस्तक्षेप करावा लागला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काही अॅप आता भारतात बंद होणार आहेत. यामध्ये Ullu, ALTT (आधी ALTBalaji), BigShots, Desiflix, Hothit, PrimePlay यांसह अन्य स्थानिक स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म्स ज्यांची कंटेंट मॉडरेशन धोरण संशयास्पद आढळून आले असे सर्व अॅप्सचा यात समावेश आहे.