मेटाच्या मागे हात धुवून लागलं भारत सरकार, आता इंन्स्टावरील बाल लैंगिक शोषणाच्या जाहिरातीसाठी पाठवलं समन्स
Government Summons Meta : व्हॉट्सॲपच्या नवीन युजरनेम फीचर्सची केंद्र सरकारकडून चौकशी सुरु असताना आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती
Government Summons Meta : व्हॉट्सॲपच्या नवीन युजरनेम फीचर्सची केंद्र सरकारकडून चौकशी सुरु असताना आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी मेटाला समन्स पाठवलं आहे. माहितीनुसार, इंस्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाच्या जाहिराती सुरु असल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत मेटाला या प्रकरणात समन्स पाठवले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्रकरणाबाबत मेटाकडून स्पष्टीकरण देखील मागवले आहे. तसेच या प्रकरणात कंपनीने कोणती ठोस पावले उचलली आहेत याची सविस्तर माहिती देखील देण्यास सांगितले आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बीबीसीचा एक अहवाल समोर आल्यानंतर सरकारने मेटाविरुद्ध (Meta) कारवाईला सुरुवात केली आहे. बीबीसीच्या अहवालात काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. इंस्टग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये चाइल्ड व्हिडियोज या सारख्या शब्दांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तसेच या जाहिरातींमध्ये लिंक्स वापरकर्त्यांना अशा टेलिग्राम चॅनेलवर (Telegram Channel) घेऊन जात होत्या जिथे अश्लील कंटेंट विकला जात होता. यापैकी काही कंटेंट अवघ्या 99 रुपयांना उपलब्ध असल्याचेही या अहवालात माहिती देण्यात आली आहे.
बीबीसीने या अहवालात नमूद केले आहे की, जेव्हा बीबीसीने यापैकी एका जाहिरातीबद्दल तक्रार केली तेव्हा इंस्टाग्रामने (Instagram) 24 तासांनंतर प्रतिसाद दिला आणि सांगतिलं की, संबंधित कंटेंटमध्ये कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन होत नाही. मुलांशी संबंधित अश्लील साहित्याचा प्रचार करणाऱ्या सुमारे 30 जाहिरातींची ओळख पटली आणि या जाहिराती व संबंधित टेलिग्राम चॅनेलची माहिती भारतीय अधिकाऱ्यांशी शेअर करण्यात आली असल्याची देखील माहिती बीबीसीने या अहवालात दिली आहे.
मेटाची प्रतिक्रिया
तर दुसरीकडे बीबीसीने या अहवालात मेटाची प्रतिक्रियेबद्दल देखील माहिती दिली आहे.मेटाने बीबीसीला सांगितले की, त्यांनी अनेक जाहिराती काढून टाकल्या आहेत आणि त्या पोस्ट करणाऱ्या अकॉउंट देखील बंद करण्यात आले आहेत. तसेच अतिरिक्त जाहिराती काढून टाकल्या आहेत आणि यूआरएल देखील ब्लॉक करण्यात आले असल्याची माहिती मेटाने बीबीसीला दिली असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, तज्ञ समितीचा अहवाल मागवणार
व्हॉट्सॲप युजरनेम
नुकतंच मेटाने भारतात व्हॉट्सॲप यूजरसाठी नवीन फीचर्स युजरनेम आण्याची घोषणा केली आहे. याबाबत देखील केंद्र सरकारने चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. माहितीनुसार, कंपनीला या नवीन फीचर्सबाबात सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.