LPG टंचाईवर जालीम उपाय! गॅसशिवाय 5 मिनिटांत बनणारे पोटभरीचे ‘फायरलेस’ फूड…

LPG Shortage कल्पना करा… सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा बनवायला जाता… पण गॅसच नाही आणि नवीन सिलिंडर मिळायलाही उशीर होतोय…

  • Written By: Published:
LPG टंचाईवर जालीम उपाय! गॅसशिवाय 5 मिनिटांत बनणारे पोटभरीचे 'फायरलेस' फूड...

Iran US War How to make Food Without Gas : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका आता थेट आपल्या किचनपर्यंत येऊन पोहोचलया अनेक ठिकाणी गॅसची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशा संकट काळात किंवा घाईघाईच्या आयुष्यात, जर गॅस नसेल तर, उपाशी राहायचे का? मुळीच नाही! आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही रेसिपीज, ज्यासाठी तुम्हाला गॅस पेटवण्याची किंवा गॅसची अजिबात गरज भासणार नाही. चला तर मग गॅसशिवाय अवघ्या 5 मिनिटात पोटभरीचे फायरलेस पदार्थ कसे बनवायचे त्याबद्दल जाणून घेऊया…

सर्वात आधी बोलूया आरोग्याबद्दल. जर तुम्हाला दिवसभर भरपूर ऊर्जा हवी असेल, तर ‘प्रोटीन रिच स्प्राउट्स सॅलड’ हा उत्तम पर्याय आहे. यासाठी मोड आलेले मूग, चणे आणि शेंगदाणे एकत्र करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. वरून थोडं मीठ, काळी मिरी आणि लिंबाचा रस टाकला की तुमचा ‘झिरो कुकिंग’ नाश्ता तयार!

दुपारच्या जेवणासाठी तुम्ही ‘क्रीमी दही सँडविच’ बनवू शकता. यासाठी ब्रेड भाजण्याची गरज नाही. रात्री कापडात बांधून ठेवलेलं घट्ट दही (Hung Curd) ब्रेडवर लावा, त्यावर गाजर, काकडी आणि सिमला मिरचीचे काप ठेवा. चवीसाठी थोडा चाट मसाला टाका. हे सँडविच जितकं चविष्ट आहे, तितकंच ते पोटभरीचंही आहे.

संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत हवं असेल, तर ‘फ्रूट चाट’ पेक्षा चांगलं काहीच नाही. हंगामी फळे कापून त्यात काळे मीठ आणि चाट मसाला मिसळा. यात तुम्ही फळे, ड्राय फ्रूट्स आणि दूध वापरून ‘स्मूदी’ तयार करू शकता. हे ‘वन पॉट मील’ म्हणूनही उत्तम काम करते

Easy Kitchen Tips

घरातला गॅस संपलाय आणि तुम्हाला काहीतरी गोड खायची इच्छा झालीये तरी टेन्शन नॉट यासाठी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा किस, मिल्क पावडर आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र करून छोटे छोटे लाडू वळा आणि १५-२० मिनिटे सेट होऊ द्या. विना गॅस, विना कष्ट… तुमची मिठाई तयार!

तर, मित्रांनो परिस्थिती कोणतीही असो, मानवी बुद्धी त्यावर नेहमीच उपाय शोधते. गॅसची टंचाई असो किंवा वेळेचा अभाव, हे ‘फायरलेस’ पदार्थ तुम्हाला आरोग्य आणि चव दोन्ही देतील. तर मग, युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅसच्या टंचाईत अवघ्या काही मिनिटात होणारे 5 फायलेस रेसिपीज नक्की ट्राय करा!

follow us