JEE-NEET पॅटर्न बदलणार? पालकांना मिळणार मोठा आर्थिक दिलासा; जाणून घ्या नवीन नियम

JEE NEET Exam New Rules : नीट पेपर फुटीप्रकरणानंतर आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. कोचिंग

JEE NEET Exam New Rules

JEE NEET Exam New Rules : नीट पेपर फुटीप्रकरणानंतर आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. कोचिंग सेंटर्सवरील विद्यार्थ्यांची निर्भरता कमी करण्यासाठी केंद्र सरकर जेईई आणि नीट सारख्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्रालयाच्या समितीने जेईई आणि नीट या सारख्या प्रवेश परीक्षा थेट शालेतील अभ्यासाशी जोडण्याची शिफारस केली आहे.

केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केली तर डमी शाळांना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच संस्थांच्या भ्रामक जाहिरातींवरही रोख लावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती शिक्षण मंत्रायलयाकडून देण्यात येत आहे. या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी देशातील अनेक विद्यार्थी कोचिंगसाठी शाळांपासून दूर राहत असल्याने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. जर नवीन धोरण लागू झाल्यास विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती, वर्गातील अध्ययन आणि नियमित शैक्षणिक कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे नीट पेपरफुटी (NEET Exam) प्रकरणानंतर देशात या प्रवेश परीक्षा प्रणालीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. विरोधकांसह अनेक विद्यार्थी शिक्षण मंत्रीचा राजानीमा मागत आहे. पेपरफुटीनंतर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 9 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. केंद्र सरकारने जर या समितीच्या शिफारस स्वीकारल्या तर कोचिंग क्लासेसवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्याची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही. त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

बिनशर्त माफीनंतर श्रीसंतला दिलासा; ‘त्या’ प्रकरणात केसीएने उठवली तीन वर्षांची बंदी-

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत पुणेसह देशभरातून आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सीबीआयकडून सखोल चौकशी देखील सुरु आहे.

follow us