Karnatak Election Result 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन; म्हणाले, आता तुम्ही…

Karnatak Election Result 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन; म्हणाले, आता तुम्ही…

 Karnatak Election Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय आता निश्चित झाला आहे. काँग्रेसने भाजपाला कर्नाटकमध्ये धोबीपछाड दिली आहे. कर्नाटक मध्ये भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत् प्रकाश नड्डा व त्यांच्या इतर राज्यांचे मुख्यमंत्री असे सर्व नेते प्रचारासाठी आले होते.

तर काँग्रेसनेही आपले नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे असे सर्व नेते प्रचारासाठी उतरवले होते. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला. परंतु आज निकालाच्या दिवशी काँग्रेसने यात बाजी मारली आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत काँग्रेसचे अभिनंदन केले आहे व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.

पीएम मोदी, अमित शहा, राहुल गांधींचा तुफान प्रचार; पाहा, कुणाची कामगिरी ठरली बेस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे मी कौतुक करतो असेही ते म्हणाले आहे.

 

 

दरम्यान, भाजपकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जेपी नड्डा यांनी प्रचार केला. पीएम मोदींनी 44 मतदारसंघ कव्हर केले. यामध्ये 17 ठिकाणी भाजप, 24 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर जेडीएसच्या 3 उमेदवारांना यश मिळाले. पीएम मोदी यांचा स्ट्राइक रेट 39 टक्के राहिला.

तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 26 विधानसभा मतदारसंघात तुफान प्रचार केला. यामध्ये त्यांनी 17 मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून दिला. तर 8 ठिकाणी भाजप आणि एका जागेवर जेडीएसचा उमेदवार विजयी झाला. या हिशोबाने राहुल गांधींचा स्ट्राइक रेट 65 टक्के राहिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube