मल्लिकार्जुन खर्गें कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार का? वाचा काय म्हणाले…

मल्लिकार्जुन खर्गें कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार का? वाचा काय म्हणाले…

Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आमचे आमदार चोरीला जातात त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ‘इंडिया टुडे राउंडटेबल’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “कर्नाटकमध्ये आम्ही चांगले काम करू, चांगली कामगिरी करू, लक्ष्य पूर्ण करू आणि जिंकू. आमचे लोक राज्यापासून बूथ स्तरापर्यंत रात्रंदिवस काम करत आहेत. मी आकड्यांवर विश्वास ठेवत नाही. कारण ही निवडणूक आहे. पण आम्ही बहुमताने जिंकू.”

Breaking news ; सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना कोरोनाची लागण

मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, “कधीकधी आमचे आमदार चोरीला जातात, त्यामुळे जास्त जागा जिंकणे गरजेचे असते. भाजप हे काम केवळ दबाव निर्माण करून करते. कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, गोवा, मध्य प्रदेशात त्यांनी असेच केले आहे. चोरी होऊ नये म्हणूनच जास्त स्टॉक ठेवला पाहिजे. लोकांचा काय अंदाच आहे त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला जिंकायच्या आहेत.”

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय हायकमांड घेईल. हायकमांडमध्ये सर्व नेते आहेत, समिती आहे, सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत. मी कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नाही, राज्यांमध्ये मुख्यमंत्री नेमण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. मला राज्याच्या राजकारणात जायचे नाही. आमचे कार्यकर्ते कठोर परिश्रम घेत आहेत आणि आम्ही जिंकू. कर्नाटकातील डबल इंजिन सरकारचे इंजिन उद्ध्वस्त झाले असून जनता आता या भ्रष्ट सरकारला कंटाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube