Karnataka Government : काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या पुत्राची सिद्धरामय्या सरकारमध्ये वर्णी; 9 शिलेदारांसह झाले शपथबद्ध
Karnataka Government Oath Ceremony : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसनं (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP) संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी दोन प्रबळ दावेदार होते.
त्यात पहिले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दुसरे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार(D.K. Shivakumar). काही दिवसांच्या मंथनानंतर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. त्यानंतर आता आज कर्नाटक सरकरचा शपथविधी पडला. यावेळी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Senior Congress leader Siddaramaiah takes oath as the Chief Minister of Karnataka in Bengaluru. pic.twitter.com/9VUBNNsuv2
— ANI (@ANI) May 20, 2023
Karnataka Government : नवा गडी, नवं राज्य… : सिद्धरामय्या होणार शपथबद्ध
यानंतर आता सिद्धरामय्या यांच्या मंत्रीमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार याविषयी अनेक शक्यता लावल्या जात होत्या. आता यामध्ये काही नावे समोर आली आहेत. यासंबंधी केंद्रीय काँग्रेस कमिटीने नोटिफिकेशन काढले आहे. यामध्ये मंत्रीमंडळात सहभागी होणाऱ्यांची नावे देण्यात आली आहे.
यामध्ये जी परमेश्वर, के एच मुनीयप्पा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, सतिश जरकीहोली, प्रियांक खर्गे, रामलिंग रेड्डी, बी. झेड. झमीर अहमद खान या नावांची मंत्री पदासाठी वर्णी लागली आहे.
हा शपथविधी सोहळा कर्नाटकच्या बंगळुरूमधील श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला. याच स्टेडियमवर सिद्धरमय्या यांनी 2013 पहिल्यांदा शपथ घेतली होती. राज्यपाल थावरचंद गेहलोत दुपारी 12.30 वाजता त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये कॉंग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये कॉंग्रेस अध्य़क्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, अनेक मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते या शपथविधी सोहळ्यामध्ये उपस्थित होते.
9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा