Karnataka : कॉंग्रेसकडून ‘फोडा अन् राज्य करा’चं राजकारण; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
PM Modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी कर्नाटकमधील (Karnataka )मुडबिद्री येथे जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय आणि बजरंग बली की जयने केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आज आपण सबका साथ, सबका विकास या मंत्राने पुढे जात आहोत, याला सर्व संतांची प्रेरणा आहे.
Shirdi Saibaba : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! काऊंटरवरच आरतीचे पास मिळणार
पंतप्रधान म्हणाले की, भाजपला कर्नाटकला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवायचे आहे. त्याच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण (modernization)आणि बळकटीकरण (Reinforcement)करायचे आहे, जेणेकरून कर्नाटक एक उत्पादक महासत्ता बनू शकेल. दुसरीकडे काँग्रेस जनतेच्या निवृत्तीवर मते मागत आहे, तसेच भाजपने केलेला विकास (Development)संपवण्याच्या नावाखाली मते मागत आहे. काँग्रेसकडून जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले जात आहे. पंतप्रधानांच्या ताज्या विधानाला काँग्रेसच्या याच भूमिकेशी जोडले जात आहे.
गांधी कुटुंबावर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, आम्हाला औद्योगिक विकास, कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कर्नाटक नंबर वन बनवायचे आहे. काँग्रेसला मात्र कर्नाटकला दिल्लीमध्ये त्यांच्या राजघराण्यातील नंबर वन एटीएम बनवायचे आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींवर केली आहे. काँग्रेस कर्नाटकातील शांततेचा शत्रू, विकासाचा शत्रू असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. काँग्रेस दहशतवाद्यांचे संरक्षण करते असाही घणाघात पंतप्रधान मोदींनी केला आहे.
सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदींनी तरुणांना आवाहन केलं की, त्यांना करिअर करायचं असेल आणि त्यांना हवे ते करायचं असेल तर त्यांनी भाजपला मतदान करावं. पंतप्रधान म्हणाले की, कर्नाटकात अस्थिरता निर्माण झाली तर त्यांच्या भविष्यावर परिणाम होईल.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, जिथे लोकांना देशात शांतता आणि प्रगती हवी असेल तिथे ते आधी काँग्रेसला हद्दपार करा, समाजात शांतता असेल तर काँग्रेस शांत बसू शकत नाही. देशाची प्रगती झाली तर काँग्रेसला ते सहन होणार नाही. काँग्रेसचं संपूर्ण राजकारण फुट पाडा आणि राज्य करा असं आहे.
संपूर्ण देश सैनिकांचा आदर आणि सन्मान करतो, तर काँग्रेस आमच्या लष्कराचा अपमान करते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. देश प्रगती करत असताना काँग्रेस रिव्हर्स गियरमध्ये जगभर फिरुन देशाची बदनामी करत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर केली आहे.