खाशाबा जाधवांना 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषणाचा मार्ग मोकळा; न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Khashaba Jadhav यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे त्यांना 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण मिळणार आहे.

Khashaba Jadhav

Khashaba Jadhav’s posthumous Padma Vibhushan after 74 years Court directs Central Government : पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे खाशाबा जाधव यांना आता 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार मिळणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्राची मोरनी गौतमी पाटील तिच्या नव्या लूक बद्दल काय म्हणाली….

खाशाबा जाधव यांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्यासाठी ‘कुस्तीगीर खाशाबा जाधव फाउंडेशन’च्या वतीने नोव्हेंबर 2025 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यावेळी कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला खडसावले. तसेच त्यांनी चार मे 2026 पूर्वी खाशाबा जाधव यांना पुरस्कार देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश केंद्र सरकारला न्यायालयाने दिले आहेत.

करार न झाल्यास इराणवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला! शांतता चर्चेपुर्वी ट्रम्प यांची धमकी तर इराणचंही प्रत्युत्तर

तर मे 2017 मध्ये खाशाबा जाधव यांच्या पद्मविभूषण पुरस्काराचे फाईल सरकारकडून गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे याबाबत शिफारस करण्याचं आश्वासन दिले. मात्र त्याची देखील पूर्तता झाली नव्हती. यासाठी खाशाबा जाधव यांची पुत्र रणजीत जाधव हे न्यायालयाच्या चकरा मारत होते.

follow us