Ladakh Statehood Protest: मोठी बातमी, लडाखमध्ये इंटरनेट सेवा बंद; 50 जणांना अटक

Ladakh Statehood Protest : स्वतंत्र राज्य आणि सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीची मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलनाने लडाखमध्ये बुधवारी

  • Written By: Published:
Ladakh Statehood Protest

Ladakh Statehood Protest : स्वतंत्र राज्य आणि सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीची मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलनाने लडाखमध्ये बुधवारी 24 सप्टेंबर रोजी हिंसक वळण घेतल्याने आता या मुद्दावरुन देशाचे राजकारण चांगलेच तापायला लागले आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार लडाखमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून प्रशासनाने अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. तसेच पोलिसांनी आतापर्यंत हिंसाचारात सहभागी असणारे 50 लोकांना अटक केली आहे.

माहितीनुसार, लेह सर्वोच्च संस्थेने (LAB) राज्यत्व आणि सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीची मागणी करत पुकारलेल्या बंदमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असून आंदोलकांनी भाजप (BJP) कार्यालय तसेच अनेक वाहने पेटवून दिली. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून 80 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे.

या भागात संचारबंदी लागू

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारगिल, झंस्कर, नुब्रा, द्रास आणि इतर भागात कलम 163 अंतर्गत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या भागात लाऊडस्पीकर, मिरवणुका आणि सार्वजनिक भाषणांवरही बंदी घालण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर रस्ता दुरुस्ती करा नाहीतर रस्ता रोको आंदोलन; खासदार लंकेंचा चार दिवसांचा अल्टिमेटम

तर दुसरीकडे हिंसाचार सुरु झाल्यानंतर उपोषण करणाऱ्या हवामान कार्यकर्त्या सोनम वागंचूक यांनी उपोषण सोडले आहे. तसेच तरुणांना हिंसाचार सोडून शांततेत त्यांच्या मागण्या मांडण्याचे आवाहन केले आहे.

follow us