जमीन घोटाळ्यात झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन कचाट्यात ! इडीने काढले समन्स

  • Written By: Published:
जमीन घोटाळ्यात झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन कचाट्यात ! इडीने काढले समन्स

रांची: सरकारी जमीन विक्री घोटाळ्यात आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही (Hemant Soren) अडचणीत आले आहेत. त्यांना इडीने नोटीस पाठविली असून, 14 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहावे राहावे लागणार आहे. जमीन घोटाळ्यात व्यावसायिक विष्णू अग्रवाल, अधिकारी भानुप्रताप प्रसाद यांनी ईडीच्या चौकशीत हेमंत सोरेन यांचेही नाव घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीही आता ईडीच्या रडारवर आले आहेत. बरियातू येथील एका जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांची चौकशी होणार आहे. (land scam ed issued notice to cm Hemant Soren)

काँग्रेसने कसली कंबर! लोकसभेच्या 48 मतदारसंघासाठी शिलेदार मैदानात

मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात व्यावसायिक विष्णू अग्रवालला इडीने अटक केलेली आहे. मागील रविवारी ईडीच्या विशेष न्यायालयाने अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यांच्याकडे तब्बल पाच दिवस इडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. त्यानंतर आणखी चार दिवस इडीच्या अधिकाऱ्यांनी अग्रवाल यांच्याकडे चौकशी केली. महसूल विभागाचा अधिकारी भानुप्रताप प्रसादकडे ईडी चौकशी करत आहेत. इतर आरोपींना अटक झालेली आहे. आरोपी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव घेत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री हेमंत सोरेनही इडीच्या रडारवर आले आहे. आता त्यांना इडीने मंगळवारी नोटीस काढून हेमंत सोरेन यांना चौकशीला बोलविले आहे.

‘आहे का इथं कुणी माई का लाल…’ ; फडणवीसांना तोंडघशी पाडणारा मुनगंटीवारांचा व्हिडिओ व्हायरल

आतापर्यंत तेरा जणांना अटक
झारखंडमधील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत इडीने तेरा जणांना अटक केलेली आहे. त्यात रांची माजी उपायुक्त छवी रंजन, कोलकाता येथील व्यावसायिक अमित अग्रवाल, न्यूक्लियस मॉलचे मालक व व्यावसायिक विष्णू अग्रवाल, बडगाई अंचलचे सीईओ भानुप्रसाद याच्यासह तेरा जणांना अटक करण्यात आलेली आहे. या सर्वांकडे सुरू असलेल्या चौकशीमध्ये मोठे अधिकारी, राजकीय नेते यांची नावे घेतले आहे.

काय आहे प्रकरण ?

बनावट कागदपत्राद्वारे जमीन खरेदी विक्रीचा प्रकार आहे. रांचीमधील एका रस्त्याच्या बाजूची एक एकर जमीन आणि लष्कराच्या ताब्यात असलेली सुमारे पाच एकर जमिनीचे बनावट कागदपत्राद्वारे खरेदी-विक्री करण्यात आली होती. याप्रकरणी ईडीने एप्रिल महिन्यात रांची, जमशेदपूर, सिमडेगा, हजारीबाग, बिहार आणि पश्चिम बंगालमधील चोवीस ठिकाणी छापे मारले होते. अधिकारी भानुप्रताप प्रसादच्या घरी सरकारी जमिनीचे खरेदी-विक्रीचे कागदपत्रे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी रांचीचे माजी उपायुक्त छवी रंजना, लाइजनर प्रेम प्रकाश, व्यावसायिक विष्णू अग्रवाल आणि अमित अग्रवाल यांच्यासह अन्य लोकांनी मिळून कोटी रुपयांच्या सरकारी जमिनीची खरेदी विक्री केली होती. त्याचे पुरावेही ईडीला मिळाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube