LIC, SBI चा पैसा ‘अदानी’ यांना; …एवढी भीती कशाची? राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

  • Written By: Published:
LIC, SBI चा पैसा ‘अदानी’ यांना; …एवढी भीती कशाची? राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

एलआयसीचे, एसबीआयचे भांडवल अदानीकडे आणि आता ईपीएफओचे भांडवलही अदानीकडे. ‘मोदानी’चा पर्दाफाश होऊनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पुन्हा विचारला आहे. राहुल गांधी आज एक ट्विट करून पुन्हा एकदा अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी पुढे म्हणाले आहेत की, “आदरणीय पंतप्रधान चौकशी नाही, त्याच उत्तरही नाही! एवढी भीती कशाची?” त्यामुळे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Radhakrishna Vikhe Patil : राहुल गांधीची सावरकरांवरची टीका प्रसिद्धीसाठीच, काँग्रेसचे जहाज भरकटलेले

काँग्रेसकडून देशभर आंदोलन

दरम्यान राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जात आहेत, देशभरात निदर्शने सुरूच आहेत. आज सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते खासदार काळ्या कपड्यात संसदेत पोहोचले.

अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी आणि राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा निषेध करण्यासाठी काळे कापड परिधान करून संसदेत सर्व खासदार आल्याचं काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले.

 

खर्गे म्हणाले की पंतप्रधान मोदी देशातील लोकशाही संपवत आहेत, म्हणून आम्ही काळ्या कपड्यात आलो आहोत. त्यांनी आधी स्वायत्त संस्था रद्द केल्या, नंतर निवडणुका जिंकणाऱ्यांना धमक्या देऊन सर्वत्र आपले सरकार बसवले. मग त्यांनी ईडी, सीबीआयचा वापर करून न झुकणाऱ्यांना वेठीस धरले.

उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या फोटोला चपलांनी बडवणार का? राम कदमांचा सवाल

अदानींची संपत्ती कशी वाढली?

यावेळी खर्गे यांनी गौतम अदानी यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की अदानी प्रकरणावर संयुक्त संसदीय समिती स्थापन झाली पाहिजे. त्यातून सत्य बाहेर यावे अशी आमची इच्छा आहे. अवघ्या अडीच वर्षांत अदानीची संपत्ती एवढी कशी वाढली?  जेपीसीची स्थापना झाली तर लोकांनाही सत्य कळेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube