मिशन 2024 साठी NDA खासदारांची आज पहिली बैठक, PM मोदी देणार विजयाचा मंत्र

  • Written By: Published:
मिशन 2024 साठी NDA खासदारांची आज पहिली बैठक, PM मोदी देणार विजयाचा मंत्र

NDA MPs Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (31 जुलै) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांची बैठक घेऊन त्यांना आगामी निवडणुकांच्या संदर्भात विजयाचा मंत्र देऊ शकतात. सूत्रांनी रविवारी (30 जुलै) ही माहिती दिली. एनडीएच्या खासदारांच्या बैठकीचा कार्यक्रम 11 दिवसांचा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सर्व NDA खासदारांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये 31 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान बैठकांचं नियोजन करण्यात आलं आहे. (lok sabha elections 2024 pm narendra modi to address nda mps meetings amit shah jp nadda including many leaders to take part)

एनडीएच्या खासदारांचे एकूण 11 गट तयार करण्यात आले आहेत. एका दिवसात दोन गट बैठका होणार आहेत. संध्याकाळी साडेसहा वाजता उत्तर प्रदेशच्या खासदारांसोबत पहिली बैठक सुरू होईल. दुसरी बैठक साडेसात वाजता होईल.

एनडीएच्या खासदारांच्या पहिल्या आणि दुसऱ्या बैठकीचे वेळापत्रक

पश्चिम, ब्रज, कानपूर आणि बुंदेलखंड भागातील खासदारांसह दिल्लीतील महाराष्ट्र सदनात संध्याकाळी 6.30 वाजता पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप नेते संजीव बल्यान आणि बीएल वर्मा उपस्थित राहणार आहेत.

‘फास्ट ट्रॅक ट्रायलची मागणी’, मणिपूर घटनेची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

दोन्ही बैठकांचे ठिकाण वेगळे असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्येक गटाच्या बैठकीला पंतप्रधान मोदी नक्कीच उपस्थित राहतील. पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाचे खासदार दुसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, शंतनू ठाकूर, भाजप नेते बैजयंत पांडा आणि दिलीप घोष आदी उपस्थित राहणार आहेत. दुसरी बैठक संध्याकाळी साडेसात वाजता संसद भवनात होणार आहे.

2024 च्या लढाईची तयारी

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 10 महिने शिल्लक आहेत. त्याआधी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांना एनडीए नेत्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube