Kuno National Park : चित्त्यांना भारत मानवेना! दोन दिवसांत तीन बछड्यांचा मृत्यू

Kuno National Park : चित्त्यांना भारत मानवेना! दोन दिवसांत तीन बछड्यांचा मृत्यू

Cheetah Cubs died : नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणल्या गेलेल्या चित्त्यांसाठी देशातील वातावरण मारक ठरत आहेत. चित्ते सातत्याने मृत्यूमुखी पडत आहेत. फक्त दोन दिवसात तीन बछड्यांचा मृत्यू (Cheetah Cubs Died) झाला आहे. तर चौथ्या बछड्याची प्रकृती गंभीर आहे.

मध्य प्रदेशच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी सकाळी एक बछड्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या बछड्यांची आई आणि तिच्या आणखी तीन बछड्यांवर नजर ठेवण्यात आली. निगराणी दरम्यान उन्हाचा कडाका वाढू लागला तशी या बछड्यांची प्रकृती खराब होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असतानाच आणखी दोन बछड्यांचा मृत्यू झाला.

मार्च महिन्यातच या चार बछड्यांचा जन्म झाला होता. मात्र तीन महिन्यांच्या आतच यातील तीन बछड्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुनो नॅशनल पार्कच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या दिवशी या बछड्यांची प्रकृती बिघडली त्या दिवशी तापमान खूप वाढले होते. या दिवशी तापमान 46 अंशांच्या आसपास होते.

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून वीस चित्ते कुनो अभयारण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर ज्वाला नामक मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिल्यानंतर चित्त्यांची एकूण संख्या 24 झाली होती. यातील 24 पैकी तीन बछडे आणि तीन वयस्क चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. आता येथे फक्त 18 चित्ते शिल्लक आहेत.
१९५२ मध्येच चित्ता नामशेष झाल्याचे घोषित

१९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशाच्या जंगलात सोडण्यात आले असलेले हे चित्ते नामिबियातील आहेत. त्यांना या नवीन वर्षांच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये ८ चित्ते सोडले होते. मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात ८ चित्ते आणण्यात आले होते. या चित्त्यांची चर्चा देशभर चांगलीच झाली.

आफ्रिकेतील चित्त्यांचे भारतात मरण; तिसऱ्या चित्त्यानेही सोडला प्राण

नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदा भारतात चित्ते बघितले गेले. त्याअगोदर सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे, ३ चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले गेले आहेत, आता त्यानंतर १२ चित्त्यांची भर त्यामध्ये टाकण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube