‘महात्मा गांधी फक्त हायस्कुल पास, त्यांच्याकडे कोणतीही डिग्री नव्हती’ काश्मीरच्या नायब राज्यपालांच वादग्रस्त वक्तव्य
काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी महात्मा गांधी यांच्या शिक्षणावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले की काही लोक गांधीजींबद्दल विचार करतात की त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे. परंतु हे सत्य नाही. त्यांची शैक्षणिक पात्रता फक्त हायस्कूल पर्यतची होती.
२३ मार्च रोजी शहिद दिनासोबत डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्मदिवसही येतो. या निमित्ताने नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ग्वालियरमधील आयटीएम विद्यापीठात भाषण केले. या दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कौतुकासोबत महात्मा गांधींच्या पदवीवर भाष्य केले. त्यावेळी ते म्हणाले की गांधीजींनी कोणतीही पदवी घेतली नाही.
राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; ‘डरो मत’ देशव्यापी आंदोलनाची घोषणा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार डॉ. राम मनोहर लोहिया स्मृति व्याख्यान सोहळ्याला संबोधित करताना काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, “गांधीजींनी अनेक मोठ्या गोष्टी केल्या. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याच्या आयुष्यात त्यांनी कधीही सत्य सोडलं नाहीत.”
पण याचवेळी ते पुढे म्हणाले की, “मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की अतिशय सुशिक्षित लोकांना असे वाटते की गांधीजींनी कायद्याची पदवी घेतली आहे. पण त्याच्याकडे पदवी नव्हती. त्यांनी कायद्याची कोणतीही पदवी घेतली नाही. पण आज गांधीजी शिकले नाहीत असे कोणीही म्हणू शकत नाही.”
वकील होते पण पदवी नव्हती
महात्मा गांधींबद्दल सार्वजनिक माहितीनुसार महात्मा गांधी १८८३ साली दक्षिण आफ्रिकेला गेले. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता आणि वकीलही बनले होता. पण मनोज सिन्हा हे नाकारतात. ते म्हणाले की, अनेक शिक्षित लोकांना असे वाटते की गांधीजी पदवी धारक आहेत पण तसे नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, जे मी नंतर आपल्याबरोबर शेअर करेन.