ममता बॅनर्जींना एक मागून एक धक्के! 58 आमदारांनंतर आता 21 खासदारही गट स्थापनेच्या तयार…

Mamata Banerjee यांच्याकडे 58 आमदारांनी पाठ फिरवल्यनंतर आता 21 खासदार देखील वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

Mamata Banerjee

Mamata Banerjee gets another setback After 58 MLAs, now 21 MPs are ready to form a group : पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षातील अंतर्गत संघर्ष आता टोकाला गेला आहे. माजी मुख्यमंत्री व पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या हातातून पक्ष गेल्यासारखी परिस्थिती आहे. सत्तेत असताना पक्षावर वचक असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडे 58 आमदारांनी पाठ फिरवल्यनंतर आता 21 खासदार देखील वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

ममता बॅनर्जींना एक मागून एक धक्के!

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित असतानाच पक्षातील काही खासदारांच्या गटाने गुप्त बैठक घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendar Yadav) यांच्या निवासस्थानी भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राज्यसभेचा राजीनामा देणारे सुखेंदू शेखर रॉय (Sukhendu Sekhar Roy) हेही उपस्थित होते.

भुजबळांना नाकारण्यामागे नेमकं काय? राजेंद्र जैनांच्या उमेदवारीनंतर वडेट्टीवार म्हणाले, फडणवीस सांगतील तेच स्वीकारावे लागते

ही बैठक बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या उपस्थितीत पार पडल्याचे सांगितले जात आहे. याआधी टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांनी दिल्लीत गुप्त बैठक घेतली होती. या बैठकीत प्रसून बॅनर्जी (Prasun Banerjee) सताबडी रॉय (Satabdi Roy) आणि जगदिश बसुनिया (Jagadish Basunia) यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

अजितदादांविषयी अपशब्द; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, मासाळचा माफीनामा अन् आत्मक्लेशचा निर्णय

सूत्रांच्या माहितीनुसार, हे खासदार लोकसभा अध्यक्ष दिल्लीला परतल्यानंतर सामूहिकरीत्या राजीनामे सादर करू शकतात. तसेच 20 खासदारांच्या स्वाक्षऱ्यांसह लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याचाही पर्याय त्यांच्या चर्चेत आहे. भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर पुढील राजकीय रणनीती काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us