Manipur Violence: मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार व विवस्त्र व्हिडिओ प्रकरण सीबीआयकडे

  • Written By: Published:
Manipur Violence: मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार व विवस्त्र व्हिडिओ प्रकरण सीबीआयकडे

Manipur Violence: आरक्षण आणि जमिनीच्या वाटपावरून मणिपूर राज्य पेटले आहे. त्यात महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मणिपूरमधील दोन महिलांवरील अत्याचार व विवस्त्र व्हायरल व्हिडिओ प्रकरणसमोर आले आहे. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरले आहे. देशभरातून या प्रकरणाचा निषेध करण्यात येत आहे. महिलांवरील अत्याचार व विवस्त्र धिंड प्रकरणाची चौकशी आता सीबीआयमार्फत करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. (manipur violence woman rape case viral cbi investigation)

आता चित्रपट पायरसीला बसणार आळा; कठोर तरतुदी असलेलं सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक मंजुर

याबाबत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार एक प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणाच्या खटल्याचाही सुनावणीही मणिपूरच्या बाहेर घेतली जाणार आहे. या खटल्याची सुनावणी आसाममध्ये घेतली जाऊ शकते, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतच प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले जाणार आहे.


पुण्यात NIA ची मोठी कारवाई, दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करणाऱ्या डॉक्टरला अटक

या घटनेची चौकशी मणिपूर राज्याच्या बाहेर केली जाणार आहे. ज्या मोबाइलने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. तो मोबाइलही पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीने मोबाइलमध्ये शुटिंग केले आहे. त्याला अटक झालेली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारने मैतेई आणि कुकी समुदायातील नेत्यांशी चर्चा केलेल्या आहेत. आतापर्यंत सहा वेळा ही चर्चा झालेली आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये हिंसक घटना सुरूच आहे. लष्कर आणि निमलष्कर दलाच्या तुकड्या मणिपूरमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी 35 हजार जवान तैनात करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

मणिपूरच्या घटनेवरून विरोधकांनी भाजपला जोरदार घेरले आहे. विरोधकांनी सरकारवविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. तर सरन्यायाधीशांनीही या प्रकरणावरून केंद्र सरकारला फटकारले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube